पाचव्या दिवशी अण्णांचे वजन साडेतीन किलोने घटले

आण्णा हजारे
आण्णा हजारे

नगर ः लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. रविवारी (ता.३) अण्णा यांचे वजन तीन किलो सातशे ग्रामने कमी झाले आहे. शरीरात थकवा जाणवत आहे. दरम्यान, सरकार उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत गावकरी संतप्त झाले आहेत. ८ तारखेपर्यंत (शुक्रवार) निर्णय घेतला नाही, तर पद्मभूषण पुरस्कार परत करण्याचे अण्णांनी सांगितले. लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याने गावकरी आणि कार्यकर्ते आता संतप्त झाले आहेत. सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून आता गावकऱ्यांनीच आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने अण्णांचे वजन कमी झाले असून गावकऱ्यांना चिंता लागली आहे. उद्यापासून अाक्रमकपणे अांदोलन करत गावकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे, तर अण्णांनीही पद्मभूषण पुरस्कार केंद्र सरकारला परत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय लोकांच्या आता राळेगण सिद्धीकडे चकरा वाढल्या आहेत. आज जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आमदार, खासदारांनी आज भेटी दिल्या. हजारे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील बस स्थानक चौकात आज कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थांतर्फे एक तास रास्ता रोको करण्यात आले. या वेळी सुमारे दोन हजारांहून अधिक तरुण कार्यकर्ते, महिला व शेतकरी उपस्थित होते. या वेळी नगर-पुणे महामार्गावर सुमारे १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ``ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबाबत सोमवारी (ता. ४) संध्याकाळपर्यंत तोडगा निघाला नाही, तर मंगळवारी राळेगणसिद्धी परिवारातील सर्व कार्यकर्ते एकाच वेळी तीव्र आंदोलन करतील, तसेच मंगळवारपासून आम्ही ‘आमचे गाव, आमचे सरकार' या नियमाप्रमाणे एकाही सरकारी अधिकाऱ्यास राळेगणसिद्धीत फिरकू देणार नाही,`` असा इशारा उपसरपंच लाभेष औटी यांनी आज दिला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com