कोल्हापूर जिल्ह्यात पाच धान खरेदी केंद्रे सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यात राज्य शासनाच्या वतीने आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात पाच ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत.
Five in Kolhapur district Starting grain shopping centers
Five in Kolhapur district Starting grain shopping centers

कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात राज्य शासनाच्या वतीने आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात पाच ठिकाणी धान खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत,’’ अशी माहिती दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग विभागाच्या सूत्रांनी दिली.

चंदगड तालुका खरेदी-विक्री संघामार्फत तुर्केवाडी, चंदगड तालुका कृषिमाल फलोत्पादनामार्फत  अडकूर येथे, आजरा किसान सह. भात खरेदी विक्री संघ मर्या. आजरा, उदयगिरी शाहूवाडी तालुका सहकरी संघामार्फत मलकापूर येथे, मार्केटिंग फेडरेशनमार्फत गोकूळ- शिरगाव येथे धान खरेदी केंद्र सुरू केली आहेत.

ही खरेदी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलव्दारे करण्यात येणार आहे. त्याकरिता प्रथम शेतकऱ्यांनी त्यांचा मूळ डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा प्रत, तसेच या सातबाऱ्यावर चालू खरीप हंगाम २०२० मधील धान पीक लागवडीची नोंद असणे आवश्यक आहे. सोबत आधार कार्ड व बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्सची आवश्यकता आहे. निकषानुसार नोंद झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी करण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com