agriculture news in Marathi, five lac people affected by flood, Maharashtra | Agrowon

पुरामुळे पाच लाख बाधित; मदतीचा ओघ सुरूच

टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पुणे : पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाने सांगली व कोल्हापूरला उघडलेल्या संक्रमण शिबिरांकडे मदतीचा ओघ सुरू झाला असून, कोल्हापुरात २१० शिबिरांमध्ये ७३ हजार ४८९ लोकांची सोय करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत आतापर्यंत पुरामुळे पाच लाख लोकांना घरे सोडावी लागली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात तीन लाख ३६ हजार, तर सांगलीतील एक लाख ७४ हजार नागरिकांना घरे सोडावी लागली.

पुणे : पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाने सांगली व कोल्हापूरला उघडलेल्या संक्रमण शिबिरांकडे मदतीचा ओघ सुरू झाला असून, कोल्हापुरात २१० शिबिरांमध्ये ७३ हजार ४८९ लोकांची सोय करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत आतापर्यंत पुरामुळे पाच लाख लोकांना घरे सोडावी लागली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात तीन लाख ३६ हजार, तर सांगलीतील एक लाख ७४ हजार नागरिकांना घरे सोडावी लागली.

कोल्हापूर जिल्ह्यात तीन लाख ३६ हजार, तर सांगलीतील एक लाख ७४ हजार नागरिकांना घरे सोडावी लागली. हा आकडा केवळ सरकारने सुरक्षित हलविलेल्या नागरिकांचा असून, या व्यतिरिक्त आपापल्या स्तरावर घरे सोडून नातेवाईक किंवा इतरत्र निवारा घेतलेल्या नागरिकांची संख्या किमान दहा लाखांच्या पुढे असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

अालमट्टी धरणातून मंगळवारी सकाळी सहा लाख ११ हजार क्युसेक पाणी सोडले जात होते. धरणात पाण्याचा येवा (इनफ्लो) मात्र पाच लाख ७० हजार होता. ११० टीएमसी इतकी पूर्ण संचय पातळी असलेल्या अालमट्टीत सध्या ९२ टीएमसी पाणी आहे. कोयनेतून पाण्याचा विसर्ग सकाळी कमी होत ३५ हजार क्युसेकने सुरू होता. सांगलीत कृष्णेची पाण्याची पातळी दुपारनंतर ओसरून ५४२ मीटरपर्यंत आली. तेथे धोक्याची पातळी ५४३ मीटर असून, कृष्णा प्रथमच शांत होत असल्याचे पाहून प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास टाकला. पूरग्रस्तांना मदत वाटण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने वेग घेतला आहे.

मात्र समान पद्धतीने वाटप होण्यासाठी कोणत्याही संस्थांना परस्पर मदत वाटप करू, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या म्हणण्यानुसार, गरजूंना समान पद्धतीने वाटप करणे, तसेच कोणताही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणे असे मुख्य मुद्दे मदत वाटपात आहेत. त्यामुळे दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थेने परस्पर मदत साहित्य वाटप न करता आमच्या यंत्रणेमार्फत देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी तातडीने मदत पोचू शकले.  पूरग्रस्तांची मदत संकलित करण्यासाठी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे.

त्यासाठी उपजिल्हाधिकारी श्रीमती अस्मिता मोरे (संपर्क ८४१२०७७८९९ आणि तहसीलदार विकास भालेराव (८००७५३३१४४) यांना जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सांगलीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे (९३०७८३९९१०) कोल्हापूरला राणी ताटे (९६२३३८९६७३) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ (९९२३००९४४४), तर सातारा भागासाठीस्नेहा किसवे ( ९६०४१४६१८६) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पंचनाम्यासाठी जाणकारांची मदत घ्या ः परदेशी
पूरबाधित घरांच्या परीक्षणासाठी आणि पंचनाम्यासाठी बांधकाम अभियांत्रिकी क्षेत्रातील जाणकार व्यक्तींची मदत घ्यावी. पूरबाधित मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी. त्यासाठी मालमत्ता नोंदवही किंवा ८ अ उताऱ्यावरील नोंदीसमवेत खातरजमा करून घ्यावी. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना घरे या धोरणानुसार अनधिकृत घरांच्या पूरबाधितांनाही समाविष्ट करून घ्यावे. हे काम जास्तीत जास्त ३ आठवड्यांत पूर्ण करावे. पूरबाधित लोकांना ज्यांची घरे वारंवार पूरबाधित होतात, त्यांना अन्यत्र ठिकाणी निवारा उपलब्ध करून देणे, पक्क्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी निधी देणे आणि ज्यांची घरे कच्ची आहेत, त्यांना नवीन घरांसाठी निधी देण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...
साखर कारखान्यांना लवकरच ‘पॅकेज’मुंबई ः राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना...
कमी दरात तूर घेऊन विकली हमीभावाने; दोन...यवतमाळ ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात...
सेंद्रिय भाजीपाल्याला तयार केले ‘...झुलपेवाडी (जि. कोल्हापूर) येथील चिकोत्रा सेंद्रिय...
शेतकरीहितालाच हवे सर्वोच्च प्राधान्यसहकार क्षेत्रात पूर्वीपासूनच काँग्रेस,...
सोशल मीडिया आणि बॅंकिंग जगात आज कोट्यवधी लोक संवाद करणे आणि माहिती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...