Agriculture news in marathi Five lakes full in Tasgaon | Agrowon

तासगावातील पाच तलाव भरले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

सांगली : तासगाव तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. मात्र, यावर्षी मॉन्सूनसह अवकाळी पावसाच्या दमदार हजेरीमुळे तासगाव तालुक्यातील सात तलावापैकी पाच तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

सांगली : तासगाव तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. मात्र, यावर्षी मॉन्सूनसह अवकाळी पावसाच्या दमदार हजेरीमुळे तासगाव तालुक्यातील सात तलावापैकी पाच तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. उर्वरित तलावात पाणीसाठा होत आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात १४ टक्के पाणीसाठा होता. यंदा ८० टक्के पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.  

तासगावची दुष्काळी तालुका अशी ओळख आहे. तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघत होता. उन्हाळ्यात पाण्याअभावी, विहिरी, नद्या, बंधारे, तलाव कोरड्या पडलेल्या असायच्या. या भागात ताकरी आणि आरफळ योजनांचे पाणी फिरले आहे. त्यामुळे पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली. परंतु, अवेळी सुरु होणाऱ्या योजनांमुळे शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळत नाही. 

तासगाव तालुक्यासह पूर्व भागाच्या दुष्काळी पट्ट्यात यंदा पाणी टंचाईच्या झळा फारशा बसल्या नाहीत. पुरेसा पणीसाठा असल्याने शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात द्राक्ष शेतीला टॅंकरचा आधार घ्यावा लागला नाही. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे तलाव, विहीरी, भरल्या होत्या. दरम्यान, ताकारी योजनेच्या चार आवर्तना द्वारे या भागात पाणी फिरले. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाई भासली नाही.

चालुवर्षी मॉन्सून व अवकाळीचा तासगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला. तालक्यातील सर्वात मोठा तलाव सिध्देवाडी असून पाणीसाठवण क्षमता ३०२.९५ दश लक्ष घनफुट आहे. पेड, मोराळे, पुणदी, लोढे, हे तलावही शंभर टक्के भरले आहेत. अंजनी तलाव सध्या ९७ टक्के आहे. 

तालुक्यातील पाणीसाठा, क्षमता (दशलक्ष घन फूट)

तलावाचे नाव  पाणीसाठा साठवण क्षमता
सिध्देवाडी ३०२.९५ ३०२.९५
अंजनी ७१.८९ ७४.१५
लोढे १६३.७ १६३.७
पेड ५५.४३ ५५.४३
बलगवडे ४.८३ ३९.१
पुणदी ४९.९२ ४९.९२
मोराळे  २३  २३

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...