हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना : आरोग्यमंत्री राजेश टोपे

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे: आरोग्यमंत्री राजेश टोपे
Rajesh_Tope_1.jpg
Rajesh_Tope_1.jpg

मुंबई : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितले.  याप्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल,असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये रात्री दीडच्या सुमारास आग लागली. शॉटसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. रात्री कामावर असलेल्या परिचारिका व वॉर्ड बॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडली. या कक्षाच्या लगतच्या दुसऱ्या वॉर्डमधील बालकांना त्यांनी तातडीने हलविल्याने सात बालकांना वाचविण्यात यश आले. या दुर्घटनेमुळे दहा बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती टोपे यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com