नगर जिल्ह्यात दगावलेल्या जनावरांसाठी पाच लाखांची मदत

नगर : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यासह आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांनी जनावरांचा मृत्यू झाला. अशा ६९ पशुपालकांना ४ लाख ९४ हजार रुपयांची मदत केली आहे.
Five lakh assistance for stray animals in Nagar district
Five lakh assistance for stray animals in Nagar district

पुणे : नगर : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यासह आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांनी जनावरांचा मृत्यू झाला. अशा ६९ पशुपालकांना ४ लाख ९४ हजार रुपयांची मदत केली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या हस्ते संबंधित शेतकऱ्यांना  ही मदत नुकतीच देण्यात आली.  जिल्ह्यात यंदा  पावसाळ्यात साथीचे रोग, वीजेचा धक्का, विषबाधा व तसेच अन्य वेळी वेगवेगळ्या कारणांनी शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती.

अनेक वेळा साथीच्या आजारांसह अन्य कारणांमुळे पशुधन दगावल्यास शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण होतो. यासाठी जिल्हा परिषदेने सेस फंडातून शेतकऱ्यांना मदत दिली जाते. अशी योजना राबविणारी नगर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली आहे. -  राजश्री घुले, जिल्हा परिषद अध्यक्षा, नगर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com