नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पावणेतीन लाख दावे दाखल

नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे भरपाईसाठी शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे ऑनलाइन, ऑफलाइन तसेच ॲपद्वारे दोन लाख ७३ हजार ६३७ दावे दाखल केले आहेत.
 Five lakh claims filed by affected farmers in Nanded district
Five lakh claims filed by affected farmers in Nanded district

नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे भरपाईसाठी शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे ऑनलाइन, ऑफलाइन तसेच ॲपद्वारे दोन लाख ७३ हजार ६३७ दावे दाखल केले आहेत. यापैकी एक लाख ३५ हजार दाव्यांवर सर्वे झाले, तर अद्याप ७५ हजार दाव्यांवर सर्वे सुरु असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये तुफान पाऊस झाला. त्यामुळे अनेक मंडळात अतिवृष्टी होऊन खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे लहान-मोठ्या नद्यांसह गोदावरी नदीला पूर येऊन नदीकाठचे पिके खरडून गेली.  पाणी साचूनही पिके जळून गेली होती. याबाबत जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना इफ्को-टोकियो पीकविमा कंपनीकडे ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत दावे दाखल करण्याचे आवाहन केले होते.

या काळात ऑनलाइन दावे दाखल करताना अडचणी येत असल्यामुळे प्रशासनाकडून नुकसानीबाबत ऑफलाइने दावे स्वीकारण्याची मुभा दिली होती. यामुळे जिल्ह्यातील जुले-ऑगस्टमध्ये एक लाख ३८ हजार ७०३ दावे दाखल झाले. या दाव्यांचे संपूर्ण सर्वेही झाले. 

सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने एक लाख ३४ हजार ९३४ दावे दाखल झाले आहेत. यातील ६० हजार १४३ ठिकाणी सर्वे झाले, तर ७४ हजार ७९१ दाव्यांवर येत्या काही दिवसांत सर्वे होणार आहे, अशी माहिती विमा कंपनीकडून मिळाल्याचे कृषी विभागाने कळविले.

जिल्ह्यात जुले-ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे २ लाख ७३ हजार ६३७ दावे दाखल झाले आहेत. यांपैकी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांचे संपूर्ण सर्वे झाले. तर सप्टेंबर मध्ये एक लाख ३४ हजार ९३४ दावे दाखल झाले आहेत. यापैकी ६० हजार १४३ ठिकाणी सर्वे झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com