‘युटोपियन’कडून पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, पुरामुळे नदीकाठच्या उसाचे नुकसान झाले. वजनात घट झाली. या परिस्थितीतही कारखान्याने ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले.’
 Five lakhs from ‘Utopian’ MT of sugarcane crushing
Five lakhs from ‘Utopian’ MT of sugarcane crushing

सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, पुरामुळे नदीकाठच्या उसाचे नुकसान झाले. वजनात घट झाली. या परिस्थितीतही कारखान्याने ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले’’, असे युटोपियन शुगर्सच्या कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सांगितले.

कचरेवाडी (ता.मंगळवेढा) येथील युटोपियन शुगर्सच्या सातव्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात परिचारक बोलत होते. वाहनांचे पूजन तांत्रिक सरव्यवस्थापक तुकाराम देवकते यांच्या हस्ते झाले.  परिचारक म्हणाले, ‘‘गळीत हंगामाच्या सुरवातीला सलग दोन महिने ८.५ ते ९ टक्के इतका कमी साखर उतारा मिळाला. त्यामध्ये फारशी सुधारणा झाली नाही. ती १० टक्क्यांच्या आसपास राहिली.

कारखान्याने एकूण गाळपाच्या ८८ टक्के कोएम -०२६५ या जातीच्या उसाचे गाळप केले. या जातीचा ऊस किमान पंधरा महिन्यांनंतर गाळपासाठी आणावा तरच १० टक्क्यांपेक्षा जास्त साखर उतारा मिळेल.’’  ‘‘साखर कारखान्यांच्या ऊस मिळवण्याच्या स्पर्धेतून कमी कालावधीचा ऊस गाळपास आणल्यानेही उतारा कमी मिळतो. साखरेला उठाव नसल्याने साखर विक्रीवर व दरावर त्याचा परिणाम झाला आहे.

साखरेचा किमान विक्री दर ३६ रुपये करावा, अन्यथा कारखानदारी मोडून पडेल. कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करणे गरजेचे आहे. किमान वेतन ७८०० रुपये करण्यात येणार आहे.’’ 

‘‘कारखाना प्रशासनाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे जानेवारी २०२१ पासून वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे. कामगारांच्या गुणवत्तेनुसार वेतनवाढ करण्यात येत आहे. किमान वेतन ठरवणारा युटोपियन हा कदाचित पहिला खासगी साखर कारखाना आहे,’’ अशी माहिती परिचारक यांनी या वेळी दिली. लक्ष्मण पांढरे यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com