agriculture news in marathi Five lakhs from ‘Utopian’ MT of sugarcane crushing | Page 2 ||| Agrowon

‘युटोपियन’कडून पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, पुरामुळे नदीकाठच्या उसाचे नुकसान झाले. वजनात घट झाली. या परिस्थितीतही कारखान्याने ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले.’

सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, पुरामुळे नदीकाठच्या उसाचे नुकसान झाले. वजनात घट झाली. या परिस्थितीतही कारखान्याने ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले’’, असे युटोपियन शुगर्सच्या कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सांगितले.

कचरेवाडी (ता.मंगळवेढा) येथील युटोपियन शुगर्सच्या सातव्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात परिचारक बोलत होते. वाहनांचे पूजन तांत्रिक सरव्यवस्थापक तुकाराम देवकते यांच्या हस्ते झाले. 
परिचारक म्हणाले, ‘‘गळीत हंगामाच्या सुरवातीला सलग दोन महिने ८.५ ते ९ टक्के इतका कमी साखर उतारा मिळाला. त्यामध्ये फारशी सुधारणा झाली नाही. ती १० टक्क्यांच्या आसपास राहिली.

कारखान्याने एकूण गाळपाच्या ८८ टक्के कोएम -०२६५ या जातीच्या उसाचे गाळप केले. या जातीचा ऊस किमान पंधरा महिन्यांनंतर गाळपासाठी आणावा तरच १० टक्क्यांपेक्षा जास्त साखर उतारा मिळेल.’’ 
‘‘साखर कारखान्यांच्या ऊस मिळवण्याच्या स्पर्धेतून कमी कालावधीचा ऊस गाळपास आणल्यानेही उतारा कमी मिळतो. साखरेला उठाव नसल्याने साखर विक्रीवर व दरावर त्याचा परिणाम झाला आहे.

साखरेचा किमान विक्री दर ३६ रुपये करावा, अन्यथा कारखानदारी मोडून पडेल. कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करणे गरजेचे आहे. किमान वेतन ७८०० रुपये करण्यात येणार आहे.’’ 

‘‘कारखाना प्रशासनाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे जानेवारी २०२१ पासून वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे. कामगारांच्या गुणवत्तेनुसार वेतनवाढ करण्यात येत आहे. किमान वेतन ठरवणारा युटोपियन हा कदाचित पहिला खासगी साखर कारखाना आहे,’’ अशी माहिती परिचारक यांनी या वेळी दिली. लक्ष्मण पांढरे यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...