agriculture news in marathi, five pesticides ban for two months, Maharashtra | Agrowon

राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन महिने बंदी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा होत असल्याच्या घटना मागील हंगामापासून सातत्याने घडत अाहेत. याची कारणे चौकशीत निष्पन्न झाली असून, कृषी खात्याने एक अधिसूचना काढत पाच कीटकनाशकांवर ६० दिवसांसाठी वितरण, विक्री किंवा वापरावर बंदी घातली अाहे. राज्याचे कृषी व जलसंधारण खात्याचे सचिव एकनाथ डवले यांनी हे अादेश काढले अाहेत. 

अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा होत असल्याच्या घटना मागील हंगामापासून सातत्याने घडत अाहेत. याची कारणे चौकशीत निष्पन्न झाली असून, कृषी खात्याने एक अधिसूचना काढत पाच कीटकनाशकांवर ६० दिवसांसाठी वितरण, विक्री किंवा वापरावर बंदी घातली अाहे. राज्याचे कृषी व जलसंधारण खात्याचे सचिव एकनाथ डवले यांनी हे अादेश काढले अाहेत. 

कीटकनाशकांच्या वापरामुळे विषबाधा झाल्याच्या घटना राज्यात याही हंगामात पुन्हा उघडकीस अाल्या अाहेत. जुलैपासून अात्तापर्यंत कीटकनाशकांमुळे झालेल्या विषबाधेच्या उपचारासाठी विविध रुग्णालयांत ३३ शेतमजूर, शेतकऱ्यांना दाखल करण्यात अाले होते. कीडनाशकांचे लेबल क्लेम, तसेच एकमेकांत मिसळून त्यांची वाढू शकणारी विषारीपणाची तीव्रता हे मुद्दे त्यातून पुढे आले होते. 

राज्य शासनाने मार्च २०१८ मध्ये पाच कीटकनाशकांची विक्री, वितरण किंवा वापर यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची विनंती केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीकडे केली अाहे. केंद्र सरकार या प्रस्तावाबाबत अाढावा घेऊन चौकशी करीत अाहे.

 कीटकनाशकांचे धोकादायक स्वरूप, तसेच विषबाधा होण्याच्या वारंवार घटना लक्षात घेता केंद्र सरकारकडून प्रस्तावावर चौकशी होईपर्यंत या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात अाली अाहे.   

या कीटकनाशकांवर बंदी
प्रोफेनोफॉस (४० टक्के) अधिक सायपरमेथ्रीन (४ टक्के) संयुक्त कीटकनाशक, फिप्रोनील ४० टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड ४० टक्के (डब्ल्यू जी), ॲसिफेट (७५ टक्के एसपी), डायफेन्थुरॉन (५० टक्के डब्ल्यूपी) व मोनोक्रोटोफॉस (३६ टक्के एसएल) या कीटकनाशकांचा समावेश अाहे.

इतर अॅग्रो विशेष
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...
इथेनॉल उत्पादन घटणारपुणे:  देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट...
अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीअकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या...
पीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना...
देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा...पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या...
किमान तापमानात घटपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर...
राज्यातील सव्वानऊ हजार गावांत पाणीपातळी...पुणे ः चालू वर्षी राज्यातील अनेक भागांत जोरदार...
शेतीतूनच जाते आर्थिक विकासवाट भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट दिवसेंदिवस...
मदत हवी दिलासादायकअवकाळी पावसाने राज्यात शेतीच्या झालेल्या...
स्वतःच्या गरजेनुसार यंत्रांची केली...बदलत्या काळात शेतीत मजुरांची संख्या कमी झाली....
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...