Agriculture news in Marathi, Five places of heavy rainfall in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात पाच ठिकाणी अतिवृष्टी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पुणे ः जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे ओढे, नाले पुन्हा खळाळून वाहू लागल्याने धरणातील पाणीपातळीही वाढली आहे. कऱ्हा, मुळा-मुठा, भिमा, घोड  नद्यांना पूर आले.

मुसळधार झालेल्या पावसामुळे पुणे शहरातील कात्रज, सहकारनगर, वारजे, चतुःशृंगी, दत्तवाडी, बालाजीनगर, संतोषनगर, आंबेगाव खुर्द, कोंढवा परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंती खचल्याने घरे पडली. त्यामुळे पुणे शहरातील तेरा व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद झाली.

पुणे ः जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे ओढे, नाले पुन्हा खळाळून वाहू लागल्याने धरणातील पाणीपातळीही वाढली आहे. कऱ्हा, मुळा-मुठा, भिमा, घोड  नद्यांना पूर आले.

मुसळधार झालेल्या पावसामुळे पुणे शहरातील कात्रज, सहकारनगर, वारजे, चतुःशृंगी, दत्तवाडी, बालाजीनगर, संतोषनगर, आंबेगाव खुर्द, कोंढवा परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंती खचल्याने घरे पडली. त्यामुळे पुणे शहरातील तेरा व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद झाली.

पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस गुरुवारी (ता. २६) पडला. सायंकाळी आठ वाजेनंतर अचानक मोठ्या प्रमाणात ढग जमा झाल्याने जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टी झाली. भिवडीत सर्वाधिक ३०७ मिलिमीटर पाऊस पडला. हवेलीतील कोथरूड येथे सर्वाधिक ९२ मिलिमीटर पाऊस पडला. तर खडकवासला ८७, खेडशिवापूर, भोसरी ६८, हडपसर ५४, पुणे शहर ५३.१, वाघोली ३९, थेऊर ३७ मिलिमीटर पाऊस पडला. तर उरुळी कांचन, चिंचवडमध्ये हलका पाऊस पडला. मुळशीतील मुठा येथे ६४ मिलिमीटर पाऊस पडला. तर पिंरगुट ४५, पौड ४४, माले ३३, थेरगाव २० मिलिमीटर पाऊस पडला. तर घोटावडे येथे हलका पाऊस पडला. भोरमधील वेळू येथे १०८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर किकवी ५३, संगमनेर ३३, भोर २१ मिलिमीटर पाऊस पडला. तर भोलावडे, नसरापूर, आंबवडे, निंगुडघर येथे हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. 

मावळातील काळे कॉलनी येथे ३६, वडगाव मावळ २४ मिलिमीटर पाऊस पडला. तर तळेगाव, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे येथे हलका पाऊस पडला. वेल्हा शहरात ५७ मिलिमीटर तर पानशेत ४१, विंझर ४९, आंबवणे ३८ मिलिमीटर पाऊस पडला. जुन्नरमधील आपटाळे येथे ३५ मिलिमीटर पाऊस पडला. तर जुन्नर, बेल्हे, ओतूर येथे हलका पाऊस पडला. खेडमधील कन्हेरसर येथे २७ मिलिमीटर पाऊस पडला. तर वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, शेळपिंपळगाव, कडूस येथेही हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. 

सातारा महामार्गावरील कापूरव्होळ - किकवी परिसरात बुधवारी (ता. २५) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, भातशेती, स्मशानभूमी व विद्युत पंपांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. भोर- कापूरव्होळ- नारायणपूर मार्गावरील चिव्हेवाडी घाटातील रस्ता व छोटा पूल वाहून गेला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

भातखाचरांचे बांध फुटले
पुरंदर तालुक्‍यातील केतकावळे येथील तलावातून पाणी मोठ्या क्षमतेने वाहू लागल्यामुळे केतकावळे, दिवळे, हरिश्‍चंद्री व कापूरव्होळ या गावांतील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे आणि गावांच्या स्मशानभूमीचे नुकसान झाले. शेतातील पाण्याच्या मोटारी, विद्युतगृह वाहून गेले. काही खाचरांचे बांध फुटले आहेत.रस्ता वाहून गेला. भोर तालुक्‍यातील निगडे, धांगवडी व किकवी येथील रस्ते पाण्याखाली गेले. किकवी येथील दलित वस्तीत पाणी शिरले. किकवी- मोरवाडी- पाचलिंगे मार्गावरील रस्ता वाहून गेला.

मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर
नवी दिल्लीः पुणे आणि बारामतीचे महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. मुख्यमंत्री शुक्रवारी (आज) पुण्याच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुण्यात पावसानेे हाहाकार 
पुणे : शहरात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजला. ओढे-नाल्यांना आलेल्या पुराने मालमत्तेसह वाहनांचे मोठे नुकसान केले. यात ६ जण मृत्यूमुखी पडले. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले.
कात्रज, पद्मावती, सहकारनगर, बिबवेवाडी परीसरामध्ये मुसळधार पाउस झाला. अरण्येश्वर नगरमधील आंबिल ओध्यानजीक असलेल्या टांगेवाली कोलनीत घरांमध्ये पाणी शिरल्याने घराची भिंत कोसळली. कात्रज बोगद्याजवळ दोन ठिकाणी दरड पडली, तसेच साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर  पावसामुळे वाहतूक संथगतीने सुरू होती.

मदतीसाठी प्रशासन कार्यरत ः पालकमंत्री पाटील
मुंबई : अतिवृष्टीमुळे पुणेे शहर व जिल्ह्यातील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या मदतीसाठी स्थानिक महसूल, पोलिस व इतर प्रशासनासह एनडीआरएफ, एसडीआरफच्या टीम तातडीने कार्यरत करण्यात आल्या आहेत. बचाव कार्य व मदत कार्य वेगाने सुरू असून नागरिकांनी मदत कार्यास सहकार्य करावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी पुणे जिल्हा ०२०-२६१२३३७१ आणि पुणे शहर ०२०-२४५४५४५४, पुणे महानगरपालिका ०२०-२५५०१२६९, ०२०-२५५०६८००/०१/०२/०३, बारामती नगर परिषद ०२११२२२२३०७ आणि ०२११२२२२४९४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन केले.


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...