agriculture news in Marathi five rupees cutting in 50 percent milk Maharashtra | Page 2 ||| Agrowon

संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के दुधाच्या दरात पाच रुपये कपात 

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे बाजारात स्किम मिल्क पावडर व बटरचे दर कमी झाल्याने दूध संघाने १ जुलैपासून गाईचे पन्नास टक्के दूध वीस रुपये तर पन्नास टक्के दूध पंचवीस रुपये प्रती लिटर दराने खरेदी केले जाणार असल्याचे सांगितले आहे.

नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे बाजारात स्किम मिल्क पावडर व बटरचे दर कमी झाल्याने दूध संघाने १ जुलैपासून गाईचे पन्नास टक्के दूध वीस रुपये तर पन्नास टक्के दूध पंचवीस रुपये प्रती लिटर दराने खरेदी केले जाणार असल्याचे सांगितले आहे. संघाच्या कार्यकारी संचालकांनी दोन दिवसांपूर्वी दूध संकलन करणाऱ्या संस्थांना पत्र देऊन कळवले आहे. खासगी दूध संघासोबत आता सहकारी दूध संघही दर कमी करु लागल्याने दूध उत्पादक हतबल झाले आहेत. 

दरम्यान, राज्य शासनाच्या महानंद दूध संघाचे अध्यक्ष असलेले रणजितसिंह देशमुख हे या तालुका दूध संघाचे अध्यक्ष असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे या संघावर वर्चस्व आहे. 

मार्च महिन्यात लॉकडाउन झाल्यानंतर दुधाला मागणी कमी झाल्याचे कारण पुढे करत दूध संकलन करणाऱ्या खासगी संघांनी टप्प्याने दहा ते बारा रुपये प्रती लिटरमागे दर कमी केला होता. गेल्या चार महिन्यांपासून दूध उत्पादक हा फटका सोसत आहेत. जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने १ जुलैपासून पन्नास टक्के दुधाचे दर कमी केले आहेत. 

‘‘कोरोना संकटाच्या काळात आपल्यावरही दूध स्वीकारण्यास अडचणी आल्या होत्या, मात्र तीन महिने राज्य शासनाने दूध स्वीकारल्यामुळे दिलासा मिळाला. मात्र सध्या कोरोनामुळे बाजारात दूध पावडर व बटरचे दर कमी झाले आहेत व उठाव नसल्याने संपूर्ण पावडर व बटर पडून आहे.
खाजगी प्रकल्पाचे दरही १८ ते २० रुपये आहेत. त्यामुळे दूध संघाने १ जुलैपासून गाईचे पन्नास टक्के दूध वीस रुपये तर पन्नास टक्के दूध पंचवीस रुपये प्रती लिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र दूध संकलन करणाऱ्या संस्थांना पाठवले आहे. पावडर व बटरला मागणी वाढून दरात सुधारणा झाल्यानंतर दूध दराबाबत कळवले जाईल,’’ असेही पत्रात नमूद केले आहे. 

सरकारने अनुदान द्यावे 
दूध संघांकडून दरात कपात केली जात आहे. सध्याच्या दुधाचा दर आणि चारा आणि पशुखाद्याचे वाढते दर पाहता उत्पादन खर्च वाढला आहे. उत्पन्न आणि खर्चात मोठी तफावत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दूध व्यवसाय उध्वस्त होईल. त्यामुळे दूध उत्पादकांना प्रती लिटर किमान पाच रुपये अमुदान द्यावे, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करत आहेत. 

प्रतिक्रिया
संगमनेर तालुका दूध संघाचे चार लाख लिटर दूध संकलन आहे. शासनाचा कोटा हा नव्वद हजार लिटरचा आहे. त्यामुळे उर्वरित तीन लाख दहा हजार लिटर दुधाला आम्हाला पंचवीस रुपये दर द्यावा लागतो. सुरुवातीच्या काळात योजना चालू झाली तेव्हा पावडरचे दर चांगले होते. पण आता पावडरचे दर मोठ्या प्रमाणात पडले आहे. त्यामुळे पंचवीस रूपयांचे दुध घेऊन त्याची पावडर बनवणे तोट्याचे आहे. खाजगी संघानेही दर कमी केले आहेत. त्यामुळे ते जर दूध स्वस्तात विकत असतील तर आमच्या संघासमोर प्रश्न निर्माण झाला आहे की आमचे महागाचे दुध कोण घेणार. त्यामुळे आम्ही आता विचार करत आहोत. 
- रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष, संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक संघ. 

दुधाचा उत्पादन खर्च व पुरवठा याचा विचार करुन किमान २७ रुपये प्रतिलीटर दर असायला हवा. दोन वर्षापूर्वी झालेल्या दूध अंदोलनावेळी २५ रुपये किमान (बेसिक) दर ठरला आहे. मात्र सहकारी दूध संघच दर कमी करत असतील आणि सरकारमधील लोक कायदा मोडत असतील तर इतरांनी काय करायचे हा प्रश्न आहे. किमान दरापेक्षा कमी दर देणे चुकीचे आहे. 
- डॉ. अजित नवले, सरचिटणीस, किसान सभा, महाराष्ट्र 


इतर बातम्या
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...