agriculture news in Marathi five thousand farmers register for Mahareshim mission Maharashtra | Agrowon

महारेशीम अभियानांतर्गत पाच हजार एकरची नोंदणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

महारेशीम अभियानाला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३० जानेवारीपर्यंत अभियानाला मुदतवाढ आहे. आजवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने नर्सरी उभारण्याच्या कामाला सुरुवात करावी. तांत्रिकदृष्ट्या १० फेब्रुवारीपूर्वी नर्सरी उभी राहणे आवश्‍यक आहे.  
— दिलीप हाके, उपसंचालक, रेशीम मराठवाडा
 

औरंगाबाद: रेशीम विभागाच्यावतीने राबविल्या जात असलेल्या महारेशीम अभियानांतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत २२ जानेवारीपर्यंत ५ हजार १७८ एकरवर रेशीमसाठी तुती लागवडीची नोंद शेतकऱ्यांनी केली आहे. मराठवाड्याला २ हजार एकरवर तुती लागवडीचा लक्षांक देण्यात आला होता. रेशीम उद्योगाला शेतकऱ्यांचा सातत्याने मिळणारा वाढता प्रतिसाद शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा उद्योग किती महत्त्वाचा हे अधोरेखित करीत आहे.  

रेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पुढील वर्षासाठीच्या रेशीम उद्योगासाठी नोंदणी केली जात आहे. ७ जानेवारीपासून सुरू झालेले महारेशीम अभियान आधी २१ जानेवारीपर्यंत राबविल्या जाणार होते. या अभियानकाळातच काही ठिकाणी आलेल्या निवडणुकांमुळे तसेच नोंदणी व्यवस्थेतील तांत्रिक अडचणीमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या लक्षात घेऊन आता या अभियानांतर्गत शेतकरी व तुती क्षेत्र नोंदणीला ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत राबविल्या जाणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून पोक्राअंतर्गत सहभागी गावांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. शिवाय औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड यांसह सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याने मराठवाड्यात महारेशीम अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

याशिवाय औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रशासकीय यंत्रणेसाठी रेशीमविषयक प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणातून पोक्राअंतर्गत सहभागी गावांना नेमका महारेशीम अभियानामध्ये सहभागी करून घ्यायचा उद्देश याविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आली. 

यंदा महारेशीम अभियानात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना दिलेल्या लक्षांकात औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ३०० एकर तर राज्यातील एकूण तुती क्षेत्राच्या तुलनेत मराठवाड्यात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तुतीचे क्षेत्र आहे. जवळपास १० हजार ६७१ एकरवर विस्तारलेल्या  क्षेत्राच्या माध्यमातून १०२५३ शेतकरी रेशीम कोष उत्पादनाशी जोडले गेले आहेत. मिळालेल्या मुदतवाढीमुळे आता पुन्हा या क्षेत्रात भर पडणार हे स्पष्ट आहे. 

बीड जिल्ह्यात सर्वाधिक पसंती
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५ हजार १५९ शेतकऱ्यांनी ५ हजार  १७८ एकरवर तुती लागवडीची तयारी दाखविली. रेशीम विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार २२ जानेवारीपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ५३५ एकर, उस्मानाबाद ५८२, बीड १६१९, जालना ६९३, लातूर ८३०, परभणी ३७५, हिंगोली ३३० तर नांदेड जिल्ह्यात २१४ एकरवर तुतीच्या लागवडीची तयारी शेतकऱ्यांनी दाखविली आहे.


इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...