सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टी, पुरामुळे बाधित 

​ सातारा जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा शेती आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. भूस्खलनामुळे अनेक घरे गाडली गेली असून, ३७ जणांचा ढिगाऱ्याखाली गाडून मृत्यू झाला आहे.
पाच हजार हेक्टर क्षेत्र  अतिवृष्टी, पुरामुळे बाधित  Five thousand hectare area Excessive rains, floods
पाच हजार हेक्टर क्षेत्र  अतिवृष्टी, पुरामुळे बाधित  Five thousand hectare area Excessive rains, floods

सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा शेती आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. भूस्खलनामुळे अनेक घरे गाडली गेली असून, ३७ जणांचा ढिगाऱ्याखाली गाडून मृत्यू झाला आहे. या सोबतच नजर अंदाजे (प्राथमिक महितीनुसार) पाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पंचनामे लवकरच सुरू होणार असून, या नुकसानीच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  मुसळधार पावसामुळे कोयना, महाबळेश्वरमधील पावसाचे गेल्या दहा वर्षांतील उच्चांक मोडले. या अतिवृष्टीत पाटण, महाबळेश्वर व वाई तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यामध्ये अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली जाऊन ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मदतकार्य अद्याप युद्ध पातळीवर सुरू आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका रस्ते, शेती व मालमत्तेला बसला आहे. या नुकसानीची माहिती घेण्याचे काम शासकीय पातळीवर सुरू आहे. शेती क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक महाबळेश्वर, पाटण, जावली, कऱ्हाड, वाई, सातारा या तालुक्यांचे नुकसान झाले आहे. भात, नाचणी, सोयाबीन, भाजीपाला या पिकांचा समावेश आहे.  नजरअंदाजे ४ हजार ३०० हेक्टरवरील पिके तर ७८६ हेक्टर इतर क्षेत्र बाधित झाले आहे. कोट्यावधीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या नुकसानीत वाढ होणार आहे. शेतीतील पिके, माती वाहून जाणे, शेतात पाणी तुंबणे, बांध वाहून जाणे, कृषिपंप वाहून जाणे, अशा प्रकारच्या हानीचा समावेश आहे. अजूनही नदीकाठच्या तसेच इतर शेतात, रस्त्यावर मोठ्या पाणी असून, पाण्याचा निचरा झाल्यावर नुकसानीत वाढ होणार आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.  धरणांतून होणारा विसर्ग  प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील पाण्याची आवक कमी होऊ लागली आहे. परिणामी धरण व्यवस्थापनाकडून पाण्याच्या विसर्ग टप्याटप्याने कमी करण्यात येत आहे. सोमवारी (ता. २६) सकाळी आठ वाजता कोयना धरणाच्या दरवाज्या व पायथा वीजगृहातून ३२ हजार ७४९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.  धोममधून ५५७२, कण्हेर ५३४३, उरमोडी, १५५१, तारळी ४५१२ आणि धोम-बलकवडीतून १२९५ क्युसेक विसर्ग केला जात आहे. मागील २४ तासांत सरासरी १६.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ़  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com