Agriculture news in marathi Five thousand hectare area Excessive rains, floods | Page 3 ||| Agrowon

सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टी, पुरामुळे बाधित 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

सातारा जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा शेती आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. भूस्खलनामुळे अनेक घरे गाडली गेली असून, ३७ जणांचा ढिगाऱ्याखाली गाडून मृत्यू झाला आहे.

सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा शेती आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. भूस्खलनामुळे अनेक घरे गाडली गेली असून, ३७ जणांचा ढिगाऱ्याखाली गाडून मृत्यू झाला आहे. या सोबतच नजर अंदाजे (प्राथमिक महितीनुसार) पाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष पंचनामे लवकरच सुरू होणार असून, या नुकसानीच्या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

मुसळधार पावसामुळे कोयना, महाबळेश्वरमधील पावसाचे गेल्या दहा वर्षांतील उच्चांक मोडले. या अतिवृष्टीत पाटण, महाबळेश्वर व वाई तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यामध्ये अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली जाऊन ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मदतकार्य अद्याप युद्ध पातळीवर सुरू आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका रस्ते, शेती व मालमत्तेला बसला आहे. या नुकसानीची माहिती घेण्याचे काम शासकीय पातळीवर सुरू आहे. शेती क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक महाबळेश्वर, पाटण, जावली, कऱ्हाड, वाई, सातारा या तालुक्यांचे नुकसान झाले आहे. भात, नाचणी, सोयाबीन, भाजीपाला या पिकांचा समावेश आहे. 

नजरअंदाजे ४ हजार ३०० हेक्टरवरील पिके तर ७८६ हेक्टर इतर क्षेत्र बाधित झाले आहे. कोट्यावधीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या नुकसानीत वाढ होणार आहे. शेतीतील पिके, माती वाहून जाणे, शेतात पाणी तुंबणे, बांध वाहून जाणे, कृषिपंप वाहून जाणे, अशा प्रकारच्या हानीचा समावेश आहे. अजूनही नदीकाठच्या तसेच इतर शेतात, रस्त्यावर मोठ्या पाणी असून, पाण्याचा निचरा झाल्यावर नुकसानीत वाढ होणार आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

धरणांतून होणारा विसर्ग 
प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील पाण्याची आवक कमी होऊ लागली आहे. परिणामी धरण व्यवस्थापनाकडून पाण्याच्या विसर्ग टप्याटप्याने कमी करण्यात येत आहे. सोमवारी (ता. २६) सकाळी आठ वाजता कोयना धरणाच्या दरवाज्या व पायथा वीजगृहातून ३२ हजार ७४९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. 
धोममधून ५५७२, कण्हेर ५३४३, उरमोडी, १५५१, तारळी ४५१२ आणि धोम-बलकवडीतून १२९५ क्युसेक विसर्ग केला जात आहे. मागील २४ तासांत सरासरी १६.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 


इतर बातम्या
मराठवाड्यात नुकसानग्रस्त पिकांचे ६७.२६...औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...
'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर...नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...