Agriculture news in Marathi, Five thousand rupees per quintal onion in the Nagar | Agrowon

नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच हजार रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात लाल कांद्याला गुरुवारी पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी भाव निघाला असून सरासरी चार हजार रुपये दर मिळत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना नाशिक लाल कांद्याची लागवड करता आली नाही. साठवलेला लाल कांदा व गावरान कांदाही संपल्याने बाजार समितीत आवक घटली आहे. 

नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात लाल कांद्याला गुरुवारी पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी भाव निघाला असून सरासरी चार हजार रुपये दर मिळत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना नाशिक लाल कांद्याची लागवड करता आली नाही. साठवलेला लाल कांदा व गावरान कांदाही संपल्याने बाजार समितीत आवक घटली आहे. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत आज कांद्याने पन्नाशी गाठली. क्रमांक एकच्या कांद्याला चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव निघाला. बाजारात होणाऱ्या आवकेमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे कांदा भाव खात आहे. नगर व मराठवाड्याच्या हद्दीवर असलेल्या औरंगाबाद, बीड, पैठण, पाथर्डी, आष्टी भागातून थोड्या-फार प्रमाणात सध्या लाल कांद्याची आवक होत आहे. 

या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. कांदा दिवाळीत ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणण्याची शक्‍यता आहे.ज्यांच्याकडे थोड्याफार प्रमाणात पाणी शिल्लक आहे, त्या शेतकऱ्यांचा लाल कांदा बाजारात विक्रीस येत आहे. हा कांदा संपल्यावर नव्याने लागवड झालेला कांदा बाजारात येण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल. 

नवरात्रीदरम्यान लाल कांदा सहा हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. यंदा पाऊस कमी असल्याने कांद्याच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. रब्बीतही कांद्याची फारशी लागवड होईल याची आशा दिसेना झाली आहे. कोपरगाव बाजार समितीतही कांद्याला पावने पाच हजार रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...
पावसामुळे भात उत्पादक धास्तावलेपुणे : दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ५...नांदेड : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड, परभणी,...
बुलडाणा जिल्ह्यात २० लाख ३९ हजार मतदार...बुलडाणा : जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर,...
वाशीम जिल्ह्यात विधानसभेसाठी आज मतदानवाशीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी...
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसामुळे भातशेती...रत्नागिरी ः गेली चार ते पाच दिवस जिल्ह्यात...
सोयाबीन भिजल्याने वाढल्या अडचणीअमरावती ः शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन दोन...
नगर : दोन दिवसांपासून जिल्हाभरात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊससातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी...
पावसाने कऱ्हाड-पाटणच्या शेतकऱ्यांचा...कऱ्हाड, जि. सातारा ः मुसळधार पावसाने कऱ्हाड-पाटण...
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...