agriculture news in Marathi, five time seeding for artificial rain, Maharashtra | Agrowon

कृत्रिम पावसासाठी पाच वेळा बीजारोपण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्यात शासनाने कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू केले. ११ ऑगस्टला औरंगाबाद जिल्ह्यात १५ किलोमीटरवर तसेच जालना जिल्ह्याच्या काही भागांत ढगांवर बीजारोपण करण्यात आले. २० ऑगस्टला जालना जिल्ह्यात चार ठिकाणी आणि २१ ऑगस्टला जालना व अहमदनगर जिल्ह्यात १९ ठिकाणच्या ढगांवर बीजारोपण केले. त्यासाठी ३८ फ्लेअर्सचा वापर करण्यात आला. 

औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्यात शासनाने कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू केले. ११ ऑगस्टला औरंगाबाद जिल्ह्यात १५ किलोमीटरवर तसेच जालना जिल्ह्याच्या काही भागांत ढगांवर बीजारोपण करण्यात आले. २० ऑगस्टला जालना जिल्ह्यात चार ठिकाणी आणि २१ ऑगस्टला जालना व अहमदनगर जिल्ह्यात १९ ठिकाणच्या ढगांवर बीजारोपण केले. त्यासाठी ३८ फ्लेअर्सचा वापर करण्यात आला. 

२२ ऑगस्टला पुन्हा जालना, परभणी व बीड जिल्ह्यातील १४ ठिकाणी बीजारोपण झाले. शुक्रवारी (ता. २३) परभणी जिल्ह्याच्या दिशेने प्रयोगाची दिशा निश्‍चित करण्यात आली होती. पावसाने कमालीची ओढ दिलेल्या दुष्काळी मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असल्याचे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

आयएमडीचे शास्त्रज्ञ व प्रशासनातील अधिकाऱ्यांची ८ ऑगस्टला संयुक्‍त पत्रकार परिषद औरंगाबादच्या विभागीय आयुक्‍तालयात घेऊन ९ ऑगस्टपासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचणी मराठवाड्यात सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. दररोज सकाळी हवामान शास्त्रज्ञ प्रयोगासाठीची विदेशी यंत्रणा आदींची संयुक्‍त बैठक, त्या दिवशीच्या पावसायोग्य ढगांचा अंदाज, त्यानुसार कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठीचे विमानाचे त्या ढगांच्या दिशेने कुच करेल असे सांगण्यात आले. 

ठरल्यानुसार दुसऱ्याच दिवशी कृत्रिम पावसासाठीच्या विमानाने ९ ऑगस्टला आकाशात झेप घेतली. परंतू ढगांवर बीजारोपण न करताच विमान परतले. ११ ऑगस्टला औरंगाबाद जिल्ह्याच्या दक्षिणेस आकाशात १५ किलोमीटर अंतरावर तसेच जालना जिल्ह्याच्या भागांत ढगांवर बीजारोपण करण्यात आले. त्यानंतर प्रयोग रखडला तो १९ ऑगस्टपर्यंत.

चाचणीसाठी जे विमान आले ते प्रयोगांतर्गत विमान नाही, जे विमान प्रयोगासाठी ते विदेशातच असल्याची माहिती रखडलेल्या काळात पुढे आली. हो नाही म्हणत, विमान औरंगाबादेत दाखल झाले. परंतू पुन्हा विमान डीजीसी क्‍लीअरन्सअभावी उडाण घेऊ शकले नाही. २० ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास सोलापूरहून फ्लेअर्स घेऊन आलेल्या विमानाने रडारने दिलेल्या माहितीच्या आधारे आकाशात झेप घेऊन जालना जिल्ह्यात जवळपास चार ठिकाणी ढगांवरती बिजारोपण केले.

२१ ऑगस्टला मात्र जालना व अहमदनगर जिल्ह्यात पावसायोग्य ढग असल्याची माहिती पुढे आल्याने उडान घेणाऱ्या विमानाने जवळपास १९ ठिकाणच्या ढगांवर बीजारोपण केले. त्यासाठी ३८ फ्लेअर्सचा वापर करण्यात आला. २२ ऑगस्टला पुन्हा जालना, परभणी व बीड जिल्ह्यातील १४ ठिकाणी आकाशातील ढगांवर बीजारोपण करण्यात आले.

प्रयोगाच्या सुरवातीला दिलेल्या माहितीनुसार एका ढगांवर किमान एक किंवा दोन फ्लेअर्सचा वापर कृत्रिम पावसासाठीच्या प्रयोगात केला जातो. प्रयोगासाठीची चाचणी घेण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत हा प्रयोग सप्टेंबर अखेरपर्यंत व आवश्‍यकता वाटल्यास त्यापुढे पंधरवडा असे स्पष्ट करण्यात आले होते. 

नेमका किती पाऊस पडला?
मराठवाड्यात परतीचा पाऊस अधिक पडतो, पावसाने तशी कृपा करण्याचे संकेत दिल्यास प्रयोग सुरू राहील की गुंडाळला जाईल, हा प्रश्नही आहेच. आषाढ महिन्यात अतिघन ढग असतात. तसे मराठवाड्यात होतेही, परंतु पाऊस पडत नव्हता. मग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याअखेर सुरू झालेला कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू करण्याला उशीर झाला का, हा प्रश्नही यानिमित्ताने पुढे येतो आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाअंती नेमका कोणत्या भागात किती प्रमाणात पाऊस झाला हे अजून स्पष्ट होणे बाकी आहे हे विशेष.
 


इतर बातम्या
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना थेट...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
‘पोकरा’अंतर्गत तांत्रिक सहकार्यासाठी...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
अनियमित थंडी ऊस रिकव्हरीच्या मुळावरकोल्हापूरः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही ऊस...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
देशात केवळ ३५ तेलबिया हबनिर्मितीनवी दिल्ली: देशातील तेलबिया उत्पादन वाढावे आणि...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
राज्यात गारठा कमी, उकाडा वाढलापुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह...
संवादासाठी तंत्रज्ञान महोत्सव फायदेशीर...सोलापूर : ‘‘शेतीतील नवे ज्ञान, तंत्रज्ञान, बदल...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...