Agriculture News in Marathi Five times increase in container rent | Agrowon

कंटेनर भाड्यात पाच पट वाढ 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात कंटेनर अडकून पडले आहे. लाखो कंटेनर एकाच बंदरावर पडल्याने विदर्भातील तांदूळ उत्पादकांनी आता विशाखापट्टणम् मार्गे निर्यात करण्यास सुरुवात केली आहे.

नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात कंटेनर अडकून पडले आहे. लाखो कंटेनर एकाच बंदरावर पडल्याने विदर्भातील तांदूळ उत्पादकांनी आता विशाखापट्टणम् मार्गे निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाड्यात वाढ झाली असून, त्यांचा दर दोन लाख रुपयांवरून दहा ते १२ लाख रुपयांपर्यंत पोचल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी निर्यात आणि आयातही घटली आहे. 

देशातून निर्यात व्यवसाय तेजीत आला असताना निर्यातीच्या पद्धतीत बदल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. सरकारही या बाबत थांबा आणि पहाच्या भूमिकेत आहे. मात्र, याचा फटका व्यापाऱ्यांसह उद्योजकांना बसत आहे. सध्या काही प्रमाणात भाडे कमी होत आहे, परंतु हे अत्यंत कमी आहे. २० टीयूई कंटेनर सामान्य दिवसात १,६०० डॉलरमध्ये पाठविल्या जात होते, परंतु आज यासाठी १०,००० ते १२,००० डॉलर द्यावे लागत आहेत.

२० फूट टीयूई कंटेनर दुबई पाठविण्याकरिता सर्वसामन्याप्रसंगी १०० ते १४० डॉलर रुपये भाडे मोजावे लागत होते. आत ८५० डॉलर मोजावे लागत आहे. १२०० ते १३०० डॉलरमध्ये दक्षिण आफ्रिकेत एक कंटेनर पाठविल्या जात होते. त्यासाठी आज पाच ते सहा हजार डॉलरचा मोजावे लागत आहे. 

टाळेबंदीमुळे अमेरिकेत लाखो कंटेनर एका-एका बंदरावर अडकले आहेत. टाळेबंदीच्या काळात अमेरिकेला चीनने भरपूर वस्तूंची निर्यात केली. चीनने कंटेनर पाठविले परंतु अमेरिकेने ते परतच केले नाहीत. त्यामुळे जगभरात कंटेनरची टंचाई जाणवू लागली आहे. आजही अमेरिकेत टाळेबंदी असल्याने अनेक बंदरे बंद आहेत. एवढेच नाही तर मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे जहाज खाली करण्यासाठीही वेळ लागत आहे. पूर्वी जे जहाज ४० ते ४८ तासांत रिकामे केले जात होते.

आता त्यासाठी ९५ ते १०० तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे जहाजांना येण्या-जाण्यासाठीसुद्धा बराच वेळ लागत आहे. 
विदर्भातील तांदूळ उत्पादक पूर्वी जो माल जेएनपीटीवरून पाठवत होते, ते आता विशाखापट्टणम् मार्गाचा उपयोग करीत आहे. काही लोक काकीनाडा बंदरावरून माल पाठवीत आहे. बहुतांश तांदूळ रशिया आणि दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये पाठविला जात आहे. तसेच साखर आणि कापूस ‘ब्रेक बल्क’च्या रूपात जयगड आणि गंगावरम मार्गे निर्यात करायला लागले आहेत. 

प्रतिक्रिया 
कंटेनरची उपलब्धता वाढली आहे. मात्र, जहाजांमध्ये जागा नाही अथवा जहाज लहान असल्याने माल पाठविणे कठीण झाले आहे. ही स्थिती गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून आहे. या अडचणीमुळे मालाची आयात निर्यात ४० टक्क्यांनी कमी झालेली आहे. 
-सुधीर अग्रवाल, संचालक, रिलायन्स लॉजिस्टीक 


इतर बातम्या
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
जागतिक बाजारपेठेत कच्च्या  साखरेच्या...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेच्या...
आखाती देशातून आले धुळीचे वादळ पुणे : आखाती देशातून वाहणारे धुळीचे वादळ...
इंडोनेशिया पामतेल  निर्यात कमी करणार पुणे ः जागतिक पातळीवर खाद्यतेलाची मागणी वाढल्याने...
कार्बन कमी करण्यासाठी  बांबू लागवड हाच...पुणे ः पृथ्वीवरील कार्बनचे वाढते प्रमाण ही गंभीर...
पतपुरवठा सोसायट्यांसाठी  शिखर बॅंकेचे...पुणे ः राज्याच्या कृषी पतपुरवठा व्यवस्थेत मोलाची...
सरकारच्या उपाययोजनांनंतरही  शेतकरी...नागपूर : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच...
आत्महत्या नियंत्रणासाठी धोरणात्मक...चंद्रपूर : शेतकऱ्यांना स्वावलंबी करुन पाठबळ...
सीड पार्कचा प्रकल्प आराखडा तयार नागपूर : दर्जेदार बियाणेनिर्मिती सोबतच बियाणे...
जैव उत्तेजक उत्पादने  नोंदणीचा घोळात...पुणे ः राज्यातील जैव उत्तेजकांच्या यादीतील...
कृषी योजनांसाठी अर्जांचा ओघ सुरुचनगर ः कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, सिंचन साधने व...
निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण  हळद...हिंगोली ः हळद निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा...
पशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी अमरावती : सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी...
काजूला हमीभाव देण्याबाबत  प्रयत्न...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील काजू...
पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या उरकल्यापुणे : गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार...
औरंगाबाद दूध संघावर एकता पॅनेलचे...औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध संघाच्या सात...