द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५ व्यापाऱ्यांना अटक 

दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी व वरखेडा येथील पाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास २० लाखांची फसवणूक झाली.
grapes
grapes

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी व वरखेडा येथील पाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास २० लाखांची फसवणूक झाली. याप्रकरणी सहा व्यापाऱ्यांविरुद्ध बुधवारी (ता. १६) दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर तत्काळ सूत्रे फिरवीत शुक्रवारी (ता. १८) पोलिसांनी पाच व्यापाऱ्यांना अटक केली असून, एक संशयित अद्याप फरारी आहे. न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ही फसवणूक दोन कोटींवर झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.   

गत हंगामात द्राक्ष खरेदीपोटी या व्यापाऱ्यांनी धनादेश दिले होते. मात्र ते व्यवहारात वटले नाहीत. यावर पैसे मागितले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. वारंवार संपर्क करूनही व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने अखेर द्राक्ष उत्पादकांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

यामध्ये पुणे येथील पाडवा ग्रीन सोल्यूशन्स कंपनीचा भागीदार अमित देशमुख (मध्य प्रदेश), भूषण पवार (देवपूर), विशाल विभुते (धुळे), अमोल चव्हाण (कोथरूड), सागर जगताप (बारामती), संतोष बोराडे (निफाड) अशी फसवणूक केलेल्या संशयित व्यापाऱ्यांची नावे आहेत. यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून, अमित देशमुख अद्याप फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत. प्रशांत भोसले (पुणे) यातील मुख्य सूत्रधार असल्याचे अटक केलेल्या आरोपींचे म्हणणे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यास अटक करण्यात आली आहे. 

अटक झाल्यानंतर अनेक शेतकरी तक्रारीसाठी पुढे   पोलिस निरीक्षक आनंद तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलिस हवालदार संजय गायकवाड, दिलीप पगार, शंकर जाधव, युवराज खंडवे, धनंजय माळेकर, हेमंत पवार पोलिस नाईक शिलावाटे यांच्या पथकाने व्यापाऱ्यांच्या मुळक्या आवळल्या. पुढील तपास गायकवाड करीत आहेत. आता शेतकरी पुढे येऊन तक्रार करत आहेत. त्यामुळे दोन कोटींवर फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे फसवणूक झालेले शेतकरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com