agriculture news in Marathi five traders arrests for ditch to farmers Maharashtra | Page 2 ||| Agrowon

द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५ व्यापाऱ्यांना अटक 

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी व वरखेडा येथील पाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास २० लाखांची फसवणूक झाली.

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी व वरखेडा येथील पाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास २० लाखांची फसवणूक झाली. याप्रकरणी सहा व्यापाऱ्यांविरुद्ध बुधवारी (ता. १६) दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर तत्काळ सूत्रे फिरवीत शुक्रवारी (ता. १८) पोलिसांनी पाच व्यापाऱ्यांना अटक केली असून, एक संशयित अद्याप फरारी आहे. न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ही फसवणूक दोन कोटींवर झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.   

गत हंगामात द्राक्ष खरेदीपोटी या व्यापाऱ्यांनी धनादेश दिले होते. मात्र ते व्यवहारात वटले नाहीत. यावर पैसे मागितले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. वारंवार संपर्क करूनही व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने अखेर द्राक्ष उत्पादकांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

यामध्ये पुणे येथील पाडवा ग्रीन सोल्यूशन्स कंपनीचा भागीदार अमित देशमुख (मध्य प्रदेश), भूषण पवार (देवपूर), विशाल विभुते (धुळे), अमोल चव्हाण (कोथरूड), सागर जगताप (बारामती), संतोष बोराडे (निफाड) अशी फसवणूक केलेल्या संशयित व्यापाऱ्यांची नावे आहेत. यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून, अमित देशमुख अद्याप फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत. प्रशांत भोसले (पुणे) यातील मुख्य सूत्रधार असल्याचे अटक केलेल्या आरोपींचे म्हणणे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यास अटक करण्यात आली आहे. 

अटक झाल्यानंतर अनेक शेतकरी तक्रारीसाठी पुढे  
पोलिस निरीक्षक आनंद तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलिस हवालदार संजय गायकवाड, दिलीप पगार, शंकर जाधव, युवराज खंडवे, धनंजय माळेकर, हेमंत पवार पोलिस नाईक शिलावाटे यांच्या पथकाने व्यापाऱ्यांच्या मुळक्या आवळल्या. पुढील तपास गायकवाड करीत आहेत. आता शेतकरी पुढे येऊन तक्रार करत आहेत. त्यामुळे दोन कोटींवर फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे फसवणूक झालेले शेतकरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
‘जंतर-मंतर’वर आजपासून होणार ‘किसान... नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या...
पपईचा हंगाम बहरात; फुलधारणा सुरू जळगाव : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा किंचित...
जातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट कोल्हापूर : चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन...
शेतीमालाची सड शोधणाऱ्या उपकरणाची...नाशिक : कांदे, बटाटे, आंबा यांसह विविध फळे व...
कोकणात रविवारपर्यंत जोरदार पाऊस पुणे : कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून...
राज्यात सर्वदूर हलक्या सरी पुणे : कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत...
मत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवररत्नागिरी ः राज्यात गोड्या पाण्यातील...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
राज्यात खरिपाच्या पेरण्या ८३ टक्क्यांवरपुणे  : कोकणाच्या काही भागांत...
जिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक...
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये...पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार...
अकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे...अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची...
पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे...पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपुरात पुन्हा एकदा...
निधीअभावी सिंचन विहीर योजनेला खीळ नागपूर : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार...
दूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट...पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची...
पेरा अंतिम टप्प्यात; कर्जाची प्रतीक्षा...पुणे ः राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात...
वैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...
विदर्भात जोर वाढणार पुणे : मुंबईसह, कोकणातील बहुतांश भागात मुसळधार...
कोकण, मध्य महाराष्ट्रात संततधारपुणे : कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू...