agriculture news in marathi Five Tuesday farm breaks Tendoli tradition as a remedy for epidemics | Page 3 ||| Agrowon

पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक; महामारीवर उपाय म्हणून तेंडोळीत परंपरा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

८५ वर्षांपूर्वी आलेल्या महामारीवर उपाय म्हणून तत्कालीन सर्जुदास महाराजांनी बैलपोळ्यानंतर पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक देण्याचे सांगितले होते. महाराजांच्या या आदेशाचे पालन करत तेंडोळी ग्रामस्थांनी या परंपरेत सातत्य राखले आहे.

आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या महामारीवर उपाय म्हणून तत्कालीन सर्जुदास महाराजांनी बैलपोळ्यानंतर पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक देण्याचे सांगितले होते. महाराजांच्या या आदेशाचे पालन करत तेंडोळी ग्रामस्थांनी या परंपरेत सातत्य राखले आहे. या वर्षी देखील सोमवारी (ता.६) बैलपोळ्या नंतर पाच मंगळवार कोणतेही शेतीकाम गावात केले जाणार नाही. 

सन-१९३६ मध्ये ब्रिटिशकाळात महामारीचे संकट कोसळले होते. तेंडोळीतील प्रत्येक घरातील एक-दोन जण मरण पावत होते. या वेळी राजस्थानमधील संत श्री सरजूदास महाराज हे १९३९ मध्ये तेंडोळी येथे आले. या वेळी ग्रामस्थांनी त्यांना महामारीमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यास सांगितले. महाराजांनी काही उपाययोजना सांगितल्या. त्या उपायांची अंमलबजावणी केल्यानंतर महाराजांनी गावातील हनुमान मूर्तीचे पूजन केले. या पूजेनंतर गावातील केवळ दोन व्यक्तींचा मृत्यू होईल. त्यानंतर  मृत्यू संख्या नियंत्रणात येईल असे ते म्हणाले होते. मात्र गावात येणारे पुढची संकट टाळायचे असेल, तर बैलपोळानंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी शेती कामे थांबावी लागतील असा उपदेश त्यांनी दिला होता.

पाच मंगळवार हे व्रत करण्यास त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. आज ८५ वर्षांनंतर देखील ग्रामस्थ या उपदेशाचे अनुकरण करतात व बैल पोळ्या नंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी शेती कामे कोणीही करत नाही. या वर्षी पहिला मंगळवार ७ सप्टेंबर, दुसरा मंगळवार ४ सप्टेंबर, तिसरा मंगळवार २१, चौथा मंगळवार २८ सप्टेंबर  तर पाचवा मंगळवार ५ ऑक्टोबरला आहे.

प्रतिक्रिया...
माझे वय आज रोजी ९० वर्षे असून, माझ्या बालपणापासून बैल पोळा सण झाल्यावर येणारा पहिला मंगळवारपासून असे पाच मंगळवार शेती कामे बंद करण्यात येते. मी संत सर्जुदास महाराजांना मी स्वतः पाहिले असून माझ्या शेतातच संत सर्जुदास महाराजाचे समाधिस्थळ आहे. 
- गणपतराव नागोसे, तेडोळी,आर्णी, यवतमाळ 

अनेक वर्षांच्या परंपरेनुसार सर्वच ग्रामस्थ पोळा सणा नंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारपासून असे पाच मंगळवार शेतीचे कुठलेच काम शेतकरी किंवा शेतमजूर करीत नाही ही श्रद्धा आज रोजी ही आमच्या तेंडोळी गावात कायम आहे.
-सपना राठोड (सरपंच), ग्रामपंचायत तेंडोळी, ता. आर्णी

पोळा सणानंतर येणारे पाच मंगळवार शेतीतील कुठलेच काम होत नाही. ही संत श्री. सरजूदास महाराजावरील ग्रामस्थांची श्रद्धा आहे. महामारीपासून ही श्रद्धा सुरू झाली ती सुरूच आहे.
-परशराम राठोड (प्रगतिशील शेतकरी) रा. तेडोंळी ता. आर्णी


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...