पाच वर्षांनंतर उघडले ‘खडकपूर्णा’चे १९ दरवाजे

पाच वर्षांनंतर उघडले ‘खडकपूर्णा’चे १९ दरवाजे
पाच वर्षांनंतर उघडले ‘खडकपूर्णा’चे १९ दरवाजे

बुलडाणा  ः जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णामध्ये यंदा १०० टक्के साठा झाला आहे. मॉन्सूनोत्तर पावसामुळे प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने बुधवारी (ता. २३) १९ दरवाजे ३० सेंटिमीटरने उघडण्यात आले.  तब्बल पाच वर्षांनंतर दरवाजे उघडण्यात आल्याने खडकपूर्णा नदीत वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात मराठवाड्याला लागून असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यात खडकपूर्णा प्रकल्प असून, यामध्ये मराठवाड्यातून पाण्याची आवक होते. या वर्षी सुरवातीच्या दोन महिन्यांत हा प्रकल्प पूर्णपणे कोरडा होता. मात्र आॅगस्ट महिन्यापासून यात पाण्याची आवक सुरू झाली.  सप्टेंबर अखेरपर्यंत प्रकल्प तुडुंब भरला. सध्या या भागात जोरदार पाऊस होत असल्याने तसेच हा प्रकल्प १०० टक्के भरल्याने बुधवारी (ता.२३) प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडण्यात आले. याद्वारे खडकपूर्णा नदीपात्रात २२,४०५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीचे पात्र पूर्णपणे भरले असून, नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com