agriculture news in Marathi fix the real time data system on Almatti Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अलमट्टीवर आधुनिक रियल टाइम डाटा यंत्रणा बसवा : जयंत पाटील

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

पूरपरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्याने पाण्याची आवक-जावक, पाणीसाठा याबाबतची अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलसाठी आधुनिक रियल टाइम डाटा यंत्रणा बसवावी.

कोल्हापूर : पूरपरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्याने पाण्याची आवक-जावक, पाणीसाठा याबाबतची अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलसाठी आधुनिक रियल टाइम डाटा यंत्रणा बसवावी, अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी बंगळूरमध्ये झालेल्या बैठकीत केली. ती कर्नाटक सरकारने मान्य केल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली. 

संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजनांबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या बंगळूर येथील निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीस राज्यातील विजय कुमार गौतम, सचिव ए. पी. कोहीरकर, सहसचिव ए. ए. कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, तर कर्नाटक राज्याचे गृहमंत्री ना. बोम्मई, मुख्य सचिव राकेश सिंग, प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, मुख्य सल्लागार अनिल कुमार, जलसंपदा सचिन लक्ष्मणराव पेशवे, कार्यकारी संचालक मल्लिकाजुर्न गुंगे हे उपस्थित होते. 

सातारा, सांगली भागांत महापुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने बैठक झाली. गतवर्षी देखील राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूरपरिस्थिती टाळली होती. पूरपरिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये, यासाठी ही भेट होत असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. 

बैठकीनंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले, की दोन्ही राज्यांनी येत्या पावसाळ्यात समन्वयाने पूरपरिस्थितीवर मात करण्याचे ठरले. राज्यात डायनॅमिक पद्धतीने रियल टाइम डाटा यंत्रणा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे कर्नाटक राज्यानेही डायनॅमिक पद्धतीने रियल टाइम डाटा यंत्रणा बसवण्याची सूचना केली. त्यास कर्नाटकने सहमती दर्शवली आहे. यामुळे अलमट्टी धरणातील आवक-जावक यांची माहिती तातडीने दोन्ही राज्यांना मिळेल. अलमट्टीपुढील नारायणपूर येथील बंधाऱ्यापर्यंत पुराच्या पाण्यांचेही नियंत्रण करणे शक्य होणार आहे. 

विविध मुद्द्यांवर चर्चा 
भीमा व कृष्णा खोऱ्यातून होणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान-प्रदानाची यंत्रणा, धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्‍चितीवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारने खोऱ्यातील आधुनिक यंत्रणेव्दारे रियल टाइम डाटा यंत्रणा बसवली आहे. याचा फायदा आवक-जावक यासह कोणत्या धरणातून किती पाणी सोडावे लागणार आहे याचे नियोजन करणे सोपे होईल, यावर बैठकीत चर्चा झाली. 

चार टीएमसी पाणी कर्नाटकला देणार 
दरम्यान, उन्हाळ्यात कर्नाटकच्या काही भागांना तीव्र पाणीटंचाई जाणवते. या भागात महाराष्ट्राकडून या कालावधीत चार टीएमसी पाणी देण्याचा निर्णय बैठकीत झाला. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...