Agriculture news in Marathi Fixed charge of electricity bill postponed for three months | Agrowon

वीजबिलातील स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित ः ऊर्जामंत्री राऊत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 एप्रिल 2020

नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केला आहे. बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार, मागणी आकार पुढील ३ महिन्यांसाठी स्थगित करण्यात येत आहे. त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येईल,’’ अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. 

नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केला आहे. बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार, मागणी आकार पुढील ३ महिन्यांसाठी स्थगित करण्यात येत आहे. त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येईल,’’ अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. 

‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार, मागणी आकार माफ करावा, अशी मागणी औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती. ही मागणी ग्राह्य धरून ऊर्जामंत्र्यांनी  दिलासा दिला आहे. ‘एएमआर’मार्फत ज्या ग्राहकांचे मीटर वाचन उपलब्ध आहे, अशा ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बील देण्यात येईल. जर ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसेल, तर त्या ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात येईल. मे-२०२० मध्ये ‘एएमआर’मार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येईल, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. 

डॉ. राऊत म्हणाले, ‘‘लॉकडाऊनच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा वीजवापर झाला नसल्याचे समजून या दरम्याचे शून्य वापराचे वीजबिल देण्यात येईल. अशा ग्राहकांचे मीटर रीडिंग मिळाल्यानंतर त्यांना लॉकडाऊनच्या कालावधीत नोंदविलेल्या वास्तविक वापराचे वीजबिल देण्यात येईल.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मीटर वाचन होणार नाही. बिलिंग सरासरी मासिक वापरावर राहील. ग्राहकांना वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे सेल्फ रीडिंग (स्वत: घेतलेले) घेऊन वीजबिल भरता येईल. ज्या ग्राहकांनी स्वत:हून मीटर रीडिंग सादर केले, त्यांना सरासरीनुसार वीज आकारणी केली जाईल. पुढील काळात ज्यावेळी मीटर रीडिंग घेतले जाईल, त्यावेळी ग्राहकांना त्या महिन्यांचे सरासरी बिल आकारले जाईल, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

वीज बिल भरण्यास सवलत 
तात्काळ वीजबिल भरणा, गो-ग्रीन सवलत, डीजिटल पेमेंटबाबतच्या सवलती ग्राहकांना नियमाप्रमाणे लागू आहेत. मार्च महिन्याचे बिल भरण्यास १५ मेपर्यंत सवलत देण्यात आली आहे. तर, एप्रिल-२०२० चे वीजबिल भरण्यासाठी ३१ मे अंतिम तारीख दिली आहे. ग्राहकांनी आपले वीजबिल वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. राऊत यांनी केले.


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...