भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
अॅग्रोमनी
साखरेच्या निर्यात योजनेत लवचिकता
एखाद्या कारखान्याला देशांतर्गत वाहतूक स्वस्त पडत असेल आणि दुसऱ्या कारखान्याला देशांतर्गत वाहतुकीपेक्षा निर्यात सुलभ पडत असेल, तर एका कारखान्याचा निर्यातीचा कोटा दुसऱ्या कारखान्याचा मासिक साखर विक्री कोटा अदलाबदल करून घेण्याची सवलत देण्यात आली आहे.
कोल्हापूर : यंदा साखर जास्तीत जास्त निर्यात व्हावी यासाठी केंद्राने साखर निर्यात योजनेत काही बदल केले आहेत. एखाद्या कारखान्याला देशांतर्गत वाहतूक स्वस्त पडत असेल आणि दुसऱ्या कारखान्याला देशांतर्गत वाहतुकीपेक्षा निर्यात सुलभ पडत असेल, तर एका कारखान्याचा निर्यातीचा कोटा दुसऱ्या कारखान्याचा मासिक साखर विक्री कोटा अदलाबदल करून घेण्याची सवलत देण्यात आली आहे.
या निर्णयाचा फायदा कारखान्यांना साखर विक्री करताना होणार आहे. ज्या कारखान्यांना बंदर दूर आहे ते कारखाने बंदर जवळ असणाऱ्या कारखान्यांना निर्यातीसाठी स्वत:चा कोटा देऊ शकणार आहेत. देशांतर्गत मासिक विक्री कोट्यामध्येही या बदलाची नोंद करता येणार आहे. गेल्या वर्षीच्या साखर निर्यात अनुदान योजनेत जे साखर कारखाने साखर निर्यात करणार नाहीत त्या कारखान्यांचे निर्यात कोटे इतर कारखान्यांना केंद्राने वाढवून दिले होते. याचबरोबर निर्यात न करणाऱ्या साखर कारखान्यांना केंद्राची मदत न देण्याबाबतही भूमिका घेतली होती. यंदा मात्र केंद्राने मंगळवारी (ता. १९) निर्यातीबाबत काही नव्या सूचना जाहीर केल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांना फायदा शक्य
पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर कारखान्यांना ज्यांच्यापासून बंदर जवळ आहेत तसेच त्यांची जादा निर्यात करण्याची क्षमता आहे, त्यांना याचा फायदा होऊ शकतो. केंद्राच्या योजनेनुसार निर्यात करत अनुदान गृहीत धरल्यास निर्यात करणाऱ्या कारखान्यांना देशांतर्गत बाजारापेक्षा जादा दर मिळू शकतो. त्यांच्या दृष्टीने केंद्राने केलेला बदल फायदेशीर ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्यांना वाहतुकीच्या दृष्टीने स्थानिक विक्री फायदेशीर ठरते त्यांना इतर कारखान्यांना निर्यात कोटा देणे ही शक्य होणार आहे.
साखर वाहतुकीवरचा अतिरिक्त ताण टाळण्यासाठी केंद्राने दिलेली सवलत नक्कीच फायदेशीर आहे. बंदर जवळ असलेल्या व जादा निर्यात करू इच्छिणाऱ्या कारखान्यांना याचा निश्चित फायदा होईल.
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार
- 1 of 30
- ››