उडदाचे दर हमीभावाच्या वर टिकून

नवीन हंगामातील मूग आणि उडदाची बाजारात आवक होत आहे. मुगाची आवक वाढत असून, गेल्या आठवड्यात दर काही ठिकाणी हमीभावाच्या खाली आहेत. तर उडदाचे दर मात्र हमीभावापेक्षा अधिक होते.
Flight rates remain above guaranteed
Flight rates remain above guaranteed

पुणे : नवीन हंगामातील मूग आणि उडदाची बाजारात आवक होत आहे. मुगाची आवक वाढत असून, गेल्या आठवड्यात दर काही ठिकाणी हमीभावाच्या खाली आहेत. तर उडदाचे दर मात्र हमीभावापेक्षा अधिक होते.

गेल्या काही दिवसांत मूग आणि उडदाची आवक बाजार समित्यांमध्ये वाढत आहे. मुगाची आवक महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशात गेल्या आठवड्यात वाढली त्यामुळे दर काही प्रमाणात नरमले आहेत. यंदा केंद्र सरकारने मुगाला ७२७५ रुपये, तर उडदाला ६३०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात मूग दरात ५० ते १५० रुपयांची घसरण झाली होती. लातूर बाजार समितीत मुगाला सरासरी ६६०० ते ६६५० रुपये, अकोला बाजार समितीत ७०५० ते ७५५० रुपये सरासरी दर मिळाला. तर गेल्या आठवड्यात कर्नाटकात मूग दर टिकून होते, तर उडीद दरात १०० रुपयांची सुधारणा झाली होती. बीदर बाजारात मुगाला सरासरी ६००० ते ७००, गदग बाजारात ६२५३ ते ६९८९ आणि हुबळी बाजारात ६०६२ ते ६८६० रुपये दर मिळाला. तर उडदाचे दर ६५०० ते ७४०० रुपये दर मिळाला. 

मध्य प्रदेशात मुग दरात ५० रुपयांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात मुगाला सरासरी ५८०० ते ६६७० रुपये दर मिळाला. येथे मुगाला मागणी कायम होती. त्यामुळे दरात काहीशी सुधारणा झाली होती. राजस्थानातही नव्या मुगाला मागणी कायम होती.मागणी सामान्य असल्याने दरात जास्त चढ-उतार पाहायला मिळाले नाही. 

जयपूर बाजारात मुगाला सरासरी ६५०० ते ७१०० रुपये दर मिळाले. तर नागौर येथे ६००० ते ६७०० रुपये आणि किशनगढ बाजारात ४५०० ते ६५०० रुपये आणि केकडी बाजार समितीत सरासरी ६२०० ते ७००० रुपये दर मिळाला. तर जयपूर उडदाला मागणी वाढल्याने दरात २०० रुपयांपर्यंत दरात सुधारणा झाली होती. जयपूर उडदाला सरासरी ६६०० ते ७६०० रुपये दर मिळाला. तर केकडी उडदाला ५५०० ते ७००० रुपये सरासरी दर मिळाला. 

ललीतपूर बाजार समितीत मुगाच्या मागणीत फार वाढ किंवा घट झाली नाही त्यामुळे दरातही फार बदल पाहायला मिळाले नाहीत. यंदा मुगाला सरासरी ६००० ते ६५०० रुपये दर मिळाला. तर राजकोट बाजार समितीत मुगाच्या दरात १०० रुपयांपर्यंत घसरण झाली होती. तर मुगाला सरासरी ६००० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर विजयवाडा येथे उडदाच्या दरात १०० रुपये सुधारणा झाली होती. गेल्या आठवड्यात ७७०० ते ७९०० रुपये दर मिळाला होता. तर बरेली उडदातही १०० रुपये सुधारणा होऊन सरासरी ७२०० रुपये दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com