‘उजनी’वरील तरंगत्या सौरप्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला प्रारंभ

‘उजनी’वरील तरंगत्या सौरप्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला प्रारंभ
‘उजनी’वरील तरंगत्या सौरप्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला प्रारंभ

पुणे : जलसाठ्यावरील १ हजार मेगावॅट तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उजनी धरणावर उभारण्यात येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रियादेखील महावितरणने सुरू केली आहे. या प्रकल्पासाठीच्या व्यवहार्यता अहवालासाठी महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती. या समितीच्या अहवालानुसार निविदा प्रक्रिया सुरू केली असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.  पारंपरिक पद्धतीने विद्युतनिर्मितीच्या प्रकल्प उभारणीसाठी आलेल्या मर्यादेमुळे जलस्राेतांवर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी उजनी (जि. सोलापूर) येथील विस्तीर्ण जलाशयावर प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न सुरू होते. या प्रकल्पातून निमार्ण होणारी वीज महावितरण खरेदी करणार असून, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे.  - दृष्टीक्षेपात सौरऊर्जा प्रकल्प - उजनी धरणाच्या जलाशयावर प्रत्येकी १०० मे.वॅ च्या १० जागा निश्चित.  - या प्रकल्पामुळे १ टीएमसी पाण्याची बाष्पीभवन टाळून, पाण्याची होणार बचत. - जमिनीवरील प्रकल्पापेक्षा या प्रकल्पाची कार्यक्षमता ७ टक्क्यांपर्यंत अधिक. - या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज धरणलगतच्या शेतकऱ्यांना दिवसा उपलब्ध होणार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com