महाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध व्यवसायाचा रुळावरून घसरलेला गाडा संकटाच्या खाईतच जात आ
अॅग्रो विशेष
अद्याप ५७ गावे पुराच्या वेढ्यात
कोल्हापूर/सांगली: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पूर संथगतीने उतरत आहे. गेल्या चोवीस तासात कोल्हापुरात दोन फुटांनी तर सांगलीत पाच फुटांनी पाण्याची पातळी कमी झाली आहे. पूर ओसरल्याने महत्त्वाचे मार्ग सुरू झाले. परंतु, ग्रामीण भागातील दळणवळण ठप्पच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात पूर अत्यंत संथ गतीने ओसरत आहे. शिरोळ तालुक्यातील ४० गावांना पुराचा वेढा कायम असून सांगली जिल्ह्यातील १७ गावे अद्यापही संपर्काबाहेर आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गावांमध्ये जनावरे अडकल्याने बोटींच्या साह्याने चारा देण्याचे काम सुरू आहे. पाणी ओसरण्याचा वेग कमी असल्याने साहजिकच विशेष करून ग्रामीण भागातील पूरग्रस्त अद्याप संक्रमण शिबिरातच आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात पुराचे पाणी गतीने उतरत असले तरी पूर्वेकडे मात्र इंचाइंचाने उतरत आहे. परिणामी घरे, शेती व रस्ते रिकामे होण्याची गती अत्यंत धीमी आहे. यामुळे नुकसानीत वाढच होण्याची शक्यता आहे.
शिरोळ तालुक्यातील पूरस्थितीचा video पहा...
परिस्थिती बिकटच
- हजारो घरांची पडझड अद्यापही सुरू
- पूररग्रस्तांसमोर निवाऱ्याचा प्रश्न उभा
- मृत जनावरांच्या विल्हेवाटीचे आव्हान
- सांगलीत १७ गावांचा संपर्क तुटलेलाच
- शिरोळ तालुक्यात ४० गावांना पुराचा वेढा
- सांगलीत जनावरांना आजारांची साथ
- शहरांमध्ये आरोग्य तपासणी सुरू
- स्वच्छता मोहीम युध्दपातळीवर सुरू
- नागरिकांनी मदत दिलेल्या धान्यवाटपास प्रारंभ
- 1 of 435
- ››