agriculture news in marathi, flood affected animals gets infected by nimonia | Agrowon

पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, घटसर्पचा विळखा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने जनावरांमध्ये न्यूमोनिया आणि घटसर्प आजारांची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. आजारी जनावरांच्या औषधोपचारासाठी ९ जिल्ह्यांतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चक्राकार पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. आजारी जनावरे आणि आजारी पडू नयेत यासाठी सुमारे दीड लाख जनावरांना लसीकरण करण्यात आल्याचा दावा पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आला आहे. 

पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने जनावरांमध्ये न्यूमोनिया आणि घटसर्प आजारांची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. आजारी जनावरांच्या औषधोपचारासाठी ९ जिल्ह्यांतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चक्राकार पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. आजारी जनावरे आणि आजारी पडू नयेत यासाठी सुमारे दीड लाख जनावरांना लसीकरण करण्यात आल्याचा दावा पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून करण्यात आला आहे. 

गेल्या पंधरवड्यात सांगली, कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचे थैमान होते. याचा जनावरांच्या आरोग्यावर परिणाम झाला. सततच्या पावसामुळे गाई, म्हशी, शेळी, मेंढी आणि कोंबड्या भिजल्याने न्यूमोनिया आणि घटसर्पाची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसू लागल्याने अनेक जनावरे आजारी पडली असून, त्यांच्या उपचारासाठी पशुसंवर्धन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. 

यासाठी ९ विविध जिल्ह्यांतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चक्राकार पद्धतीने नियुक्ती केली आहे. घटसर्पाच्या लसीकरणासाठी ७ लाख मात्रा तयार असून, गरज आणि मागणीनुसार पुरवठा सुरू आहे. सध्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६० हजार मात्रा पाठविल्या असून, रविवारअखेरपर्यंत सुमारे दीड लाख जनावरांना लसीकरण आणि औषधोपचार करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी दिली.  

  दरम्यान, सुमारे आठ हजार गाई, म्हशी वाहून गेल्याची नोंद झाली आहे. मृत १ हजार ६९४ जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली आहे. अजूनही सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावे पाण्याखाली असून, पाणी ओसरल्यानंतर मृत जनावरांची आकडेवारी समोर येईल. तलाठ्यांकडून होणाऱ्या पंचनाम्यानंतर आणि पशुगणनेनुसार मृत जनावरांची आकडेवारी समोर येईल, असे डॉ. परकाळे यांनी स्पष्ट केले. आज (मंगळवार, ता. २०) मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनावरांसाठी विशेष योजनेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...