देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने उद्‍ध्वस्त व्हावे लागले; मंजूरच्या शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने उद्‍ध्वस्त व्हावे लागले; मंजूरच्या शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने उद्‍ध्वस्त व्हावे लागले; मंजूरच्या शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

मंजूर, जि. नगर : ‘‘बंधारा बांधल्यामुळे परिसरातील शेतीला अच्छे दिन आले खरे, पण २००६ ला पहिल्यांदा बंधाऱ्याची फाटके काढली नसल्याने तो फुटून बाजूची जमीन वाहून गेली, त्याच वेळी गांभीर्याने पाहिले गेले नाही. २०१७ साली बंधारा फुटला तरी दखल घेतली नाही. संजीवनी कारखान्याने बंधारा बांधला आणि देखभालीसाठी शासनाकडे वर्ग केला, परंतू अक्षम्य दुर्लक्ष झाले. त्याचाच दुष्परिणाम म्हणून कोट्यवधी रुपये किमतीची जमीन वाहून गेली. मुळात बंधारा बांधतानाचा ‘गाईडवॉल होणे गरजेचे होते, ते करण्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच हे नुकसान झाले,’ अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.  मंजूर (ता. कोपरगाव) येथे गोदावरीला पूर आल्यानंतर बंधाऱ्याच्या शेजारील ‘गाईडवॉल’ म्हणून टाकलेल्या भराव फुटल्याने नदीतील पाण्याने बंधाऱ्याएवजी पुन्हा प्रवाह बदलल्याने मंजूर गावातील तेरा शेतकऱ्यांची पंधरा एकर जमीन व विहिरी, पाइपलाइन वाहून गेल्या. मुळात या प्रकाराची तालुकाभर चर्चा झाली. पूर आल्यानंतर दोन दिवसांनी तहसीलदार एकदा येऊन गेले, तर आठ दिवसांनी तलाठ्यांनी पंचनाम्याचे सोपस्कार केले. मात्र पंचनामे कसे करणार? पूर्णतः वाहून गेलेल्या जमिनीचा नेमका मोबदला किती मिळणार? याबाबत कोणाही सांगत नसल्याने उद्‍ध्वस्त झालेले शेतकरी हतबल आहेत. २००६ नंतर २०१७ सालीही भराव फुटला. यंदा तर बंधाऱ्याच्या कोनशिलेपासून तब्बल ३०० ते ४०० फूट नदीने प्रवाह बदलला आणि सारी जमीन वाहून गेली. त्याला जबाबदार कोण, आम्ही उद्‍ध्वस्त होण्याला कोण जबाबदार, त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा संतापजनक प्रश्न येथील शेतकरी उपस्थित करत आहेत.  मंजुर बंधाऱ्याच्या अवस्थेचा पहा व्हिडिओ... बंधारा करायला सर्वांचा आग्रह, आज... बंधाऱ्यामुळे मंजूर गावासह धामोरी, मायगाव देवी, कारवाडी, चासनळी, मोरशी या गावांना बरकत मिळाली. शेतं भिजायला लागली. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटला. खूप वर्षांपासून येथे बंधारा व्हावा यासाठी परिसरातील लोक मागणी करत होते. आता मात्र मागणी करणारे कोणीही ज्याचे नुकसान झाले, शेंत वाहून गेली, त्या शेतकऱ्यांची साधी विचारपूसही करायला आले नाहीत. हा बंधारा झाला नसता तर आमची जमीन वाहूनच गेली नसती असे शिवाजी वालझाडे यांनी सांगितले. या बंधाऱ्यावरून मंजूर-कोपरगावला जाणारा रस्ताही शेतासोबत वाहून गेला आहे.  नदीने हद्द सोडल्यावर मिळतो निरोप नाशिक भागात पाऊस झाला आणि पाणी सोडले की गोदावरीला पूर येतो. हे आता या भागातील लोकांना नित्यांचेच झाले आहे. जर नदीला जास्ती पाण्याचा वरच्या भागातून विसर्ग केला तर पुराचा फटका बसू नये म्हणून लोकांना सावध करण्याची प्रशासनाची जबाबदारी. येथे मात्र पूर आल्यावर आणि नदीतल्या पाण्याने हद्द सोडल्यावरच प्रशासनाचे प्रतिनिधी येतात. लोकांना आता सोशल मीडियाच्या माधयमातून कळते, पण प्रशासनाचे आधी कोणाही इकडे फिरकत नसल्याचेही लोकांच्या बोलण्यातून गंभीर बाब समोर आली. मंजूर येथे गोदावरीच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. बंधाऱ्याला शेतीसाठी संरक्षक भिंत नसल्यानेच हे नुकसान झाल्याचे स्पष्ट आहे. कोणाच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाले, याबाबत चौकशी करून वस्तुस्थितीचा अहवाल देण्याबाबत पाटबंधारे विभागाला पत्र दिले आहे. - योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com