पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर कर्जमाफ : मुख्यमंत्री

पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर कर्जमाफ : मुख्यमंत्री
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर कर्जमाफ : मुख्यमंत्री

मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर कर्जमाफ करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. कृषी पंपाचे वीज बिल पुढील तीन महिन्यापर्यंत स्थगित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्त भागाच्या प्रश्नांवर घेण्यात आलेले निर्णय सोमवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत जाहीर केले. पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.

मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्त भागासाठी केलल्या घोषणा - 

  • - घरबांधण्याकरिता पाच ब्रास वाळू, पाच ब्रास मुरूम मोफत देण्याचा निर्णय.
  • - कोसळलेल्या घरांची पुर्नबांधणी करणार.
  • - तीन महिन्यापर्यंतचे पुरग्रस्तांना मोफत धान्य वाटप
  • - जनावरांच्या गोठ्यास भरीव मदत.
  • - व्यापाऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. यासाठी जीएसटी, आयकर भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी करण्यात येणार. 
  • - घर कोसळलेल्यांना अतिरिक्त एक लाखाची मदत करणार
  • - पुरग्रस्त भागातील कृषी पंपाचे वीज बिल पुढील तीन महिन्यापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com