agriculture news in marathi, flood afftected co_operative societies need financial assistance, Sangli | Agrowon

सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘सहकार्या’ची गरज

अभिजित डाके
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना महापुराने विळखा घातल्याने धान्य, खते, बाजाराचे मोठे नुकसान झाले आहे. वाळवा, पलूस, मिरज, शिराळा तालुक्यांतील व्यवसाय करणाऱ्या सुमारे ५० ते ६० सोसायट्यांचे सहा ते सात कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी सहकारी विविध कार्यकारी सोसायट्यांनी केली आहे.

सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना महापुराने विळखा घातल्याने धान्य, खते, बाजाराचे मोठे नुकसान झाले आहे. वाळवा, पलूस, मिरज, शिराळा तालुक्यांतील व्यवसाय करणाऱ्या सुमारे ५० ते ६० सोसायट्यांचे सहा ते सात कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी सहकारी विविध कार्यकारी सोसायट्यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यात सुमारे ७३९ विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. या सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे आपली सोसायटी कशी आर्थिक भक्कम होईल, यासाठी अनेक सोसायट्यांनी खते, दुकाने, बाजार तसेच सरकारी धान्य विक्री असे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे सोसायट्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. सोसायट्यांची उलाढाल कोट्यवधींच्या घरात पोचली आहे.

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी महापुरामुळे पलूस, वाळवा, मिरज, शिराळा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठी असणाऱ्या गावात पाणी शिरले. २००५ पेक्षा पाणी अधिक येणार नाही, अशी खात्री होती. पण पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत होती. गावेच्या गावे पाण्याखाली गेली. सोसायट्यांमधील खतांची पोती, धान्यांची पोती काढण्यासाठी धडपड सुरू होती. परंतु पाणी गतीने वाढत असल्याने जेमतेम साहित्य बाहेर काढले. पाणी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये घुसले. त्यामुळे सोसायट्यामधील कागदपत्रे, भिजली. त्याचप्रमाणे ज्या सोसायट्यांनी व्यवसाय सुरू केले होते, ते व्यवसाय पाण्यात बुडाले. त्यामुळे मोठी आर्थिक हानी झाली. अनेक सोसायट्यांनी विमा घेतला आहे. परंतु त्या विम्यातून सोसायटी पुन्हा उभी राहणे अशक्य आहे. त्यामुळे विमा कंपनीने निकष न लावता जे नुकसान झाले आहे, तेवढी भरपाई दिली तरच सोसायटी उभी राहण्यास मदत होईल.

ऑडिटची मुदत वाढ हवी
सध्या सोसायट्यांचे ऑडिट सुरू आहे. त्यांनतर वार्षिक सभा होते. परंतु पुराचे पाणी सोसायटीमध्ये जाऊन अनेक महत्त्वाची कागदपत्रे भिजली आहेत. तसेच धान्य दुकान, खत दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सोसायटीचे कामकाज पूर्वपदावर येण्यासाठी विलंब होणार आहे. त्यामुळे या पूरग्रस्त भागातील सोसायट्यांचे ऑडिटची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी सोसायट्यांने केली आहे.

  • जिल्ह्यातील एकूण सोसायट्या  : ७३९
  • वाळवा, मिरज, पलूस, शिराळा तालुक्यांतील पूरपट्ट्यातील संस्था : १०० ते १२५
  • नुकसान झालेल्या सोसायट्या : ५५ ते ६०
  • ज्या सोसायट्यांचे व्यवसायाचे झालेले नुकसान : १७ ते १८
  •  कार्यालयीन कागदपत्रे व दफ्तर भिजलेल्या सोसायट्या : १० ते १५

इतर बातम्या
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
सातारा जिल्ह्यातील ६३ हजारांवर...सातारा  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवादअमरावती : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या...कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
वाशीम जिल्ह्यात ४३७ शेतकऱ्यांचा यादीत...वाशीम  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याचा विकास गतीने...
शेतकरी कर्जमुक्तीसाठी सोलापुरात आधार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
राज्य सरकारकडून २४ हजार कोटींच्या...मुंबई  : राज्य विधिमंडळाच्या...
खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य...सोलापूर  ः सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ....
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा...पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...