कोल्हापुरात पुराचा कहर

कोल्हापुरात पुराचा कहर
कोल्हापुरात पुराचा कहर

कोल्हापूर : नद्यांना पाणी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी दिवसभर कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातही पुराच्या पाण्याने झोप उडविली. शिवारे, घरात घुसणारे पाणी, यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. सोमवारी दुपारपर्यंत सुमारे चार हजार नागरिकांचे स्थलांतर विविध ठिकाणी करण्यात आले. पाऊस कमी असणाऱ्या हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील बहुतांश गावांना पुराचा फटका बसला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिरोळ तालुक्‍यात पूरस्थिती गंभीर होण्याची शक्‍यता आहे. कोल्हापूर शहरात पंचगंगेच्या पाण्याने कहर केला असून, बहुतांश महत्त्वाच्या भागात पुराचे पाणी शिरले. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक १, ३, ४, ५, ६ व ७ असे एकूण ६ सुरू आहेत. यामधून ९९६८ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूरनियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे. कोयना धरणामधून आज सकाळी ७ वाजता १०१२४९ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली. राधानगरी धरणात आजअखेर ८.३४  टीएमसी पाणीसाठा आहे. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-गगनबावडा, संभाजीनगर-दोनोडे, इचलकरंजी-खिद्रापूर, गडहिंग्लज-नांगनूर, गडहिंग्लज-ऐनापूर, गडहिंग्लज-कोवाड, गडहिंग्लज-निलजी, गारगोटी-कोल्हापूर, गारगोटी-तिट्टा, मलकापूर-रत्नागिरी, मलकापूर-बांबवडे, चंदगड-आजरा, चंदगड-बेळगाव, चंदगड-पारगड, चंदगड-इब्राहिमपूर, चंदगड-कुरणे/भुजवडे, कुरुंदवाड-बस्तवाड, कुरुंदवाड-लाट हेरवाड, कुरुंदवाड-दानोळी कवठेसार, कुरुंदवाड-टाकळी दानवाड, कुरुंदवाड-शिरोळ धरणगुत्ती, कुरुंदवाड-अकिवाट-राजापूर, कागल-बस्तवडे, कागल-बानगे, कागल-इचलकरंजी, राधानगरी-राशिवडे, राधानगरी-हळदी, गगनबावडा तालुका या अठ्ठावीस मार्गांवरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com