agriculture news in marathi, flood conditioin worsen in Kolhapur | Page 2 ||| Agrowon

कोल्हापुरात पुराचा कहर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कोल्हापूर : नद्यांना पाणी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी दिवसभर कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातही पुराच्या पाण्याने झोप उडविली. शिवारे, घरात घुसणारे पाणी, यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. सोमवारी दुपारपर्यंत सुमारे चार हजार नागरिकांचे स्थलांतर विविध ठिकाणी करण्यात आले.

कोल्हापूर : नद्यांना पाणी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी दिवसभर कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातही पुराच्या पाण्याने झोप उडविली. शिवारे, घरात घुसणारे पाणी, यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. सोमवारी दुपारपर्यंत सुमारे चार हजार नागरिकांचे स्थलांतर विविध ठिकाणी करण्यात आले.

पाऊस कमी असणाऱ्या हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील बहुतांश गावांना पुराचा फटका बसला असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिरोळ तालुक्‍यात पूरस्थिती गंभीर होण्याची शक्‍यता आहे. कोल्हापूर शहरात पंचगंगेच्या पाण्याने कहर केला असून, बहुतांश महत्त्वाच्या भागात पुराचे पाणी शिरले. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक १, ३, ४, ५, ६ व ७ असे एकूण ६ सुरू आहेत. यामधून ९९६८ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूरनियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे. कोयना धरणामधून आज सकाळी ७ वाजता १०१२४९ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

राधानगरी धरणात आजअखेर ८.३४  टीएमसी पाणीसाठा आहे. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-गगनबावडा, संभाजीनगर-दोनोडे, इचलकरंजी-खिद्रापूर, गडहिंग्लज-नांगनूर, गडहिंग्लज-ऐनापूर, गडहिंग्लज-कोवाड, गडहिंग्लज-निलजी, गारगोटी-कोल्हापूर, गारगोटी-तिट्टा, मलकापूर-रत्नागिरी, मलकापूर-बांबवडे, चंदगड-आजरा, चंदगड-बेळगाव, चंदगड-पारगड, चंदगड-इब्राहिमपूर, चंदगड-कुरणे/भुजवडे, कुरुंदवाड-बस्तवाड, कुरुंदवाड-लाट हेरवाड, कुरुंदवाड-दानोळी कवठेसार, कुरुंदवाड-टाकळी दानवाड, कुरुंदवाड-शिरोळ धरणगुत्ती, कुरुंदवाड-अकिवाट-राजापूर, कागल-बस्तवडे, कागल-बानगे, कागल-इचलकरंजी, राधानगरी-राशिवडे, राधानगरी-हळदी, गगनबावडा तालुका या अठ्ठावीस मार्गांवरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात ६३.५९ टक्के पेरणीसातारा ः जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असली तरी...
नागपुरी संत्रा निर्यातीला खीळनागपूर  ः चीन आणि भारतादरम्यान वाढत्या...
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे संत्रा...बुलडाणा ः शेतकऱ्यांना मिळालेल्या पीकविमा बँकेने...
बुलडाणा जिल्ह्यात आठशे हेक्टरवरील...बुलडाणा  ः जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी...
जळगावात सोन्याचे दर ५० हजार ६७६ रुपये...जळगाव  ः सुवर्णनगरी म्हणून देशात प्रसिद्ध...
पालखी सोहळा परतीच्या प्रवासालापंढरपूर, जि. सोलापूर  ः आषाढी एकादशीसाठी...
लागवड अश्‍वगंधाचीअश्‍वगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती भारतात सर्वत्र...
विस्तारवादाचे युग कधीच संपले आहे ः...लेह / नवी दिल्ली  : ‘‘ विस्तारवादाचे...
रहू, चटई पद्धतीने भात लागवडीचे नियोजनचटई पद्धतीने नवीन भात रोपवाटिका तयार करावी. या...
कृषी सल्ला : सूर्यफूल, बाजरी, कापूस,...सूर्यफूल पेरणी वाणांची निवड :  अ)...
हिंगोलीत हरभरा ४१०० ते ४३५८ रुपये...हिंगोली : ‘‘हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
ज्वारी उत्पादनवाढीची सूत्रेज्वारी हे कमी पावसात धान्य व कडब्याचे हमखास...
खेड येथे नुकसानीच्या प्रश्‍नांवर...पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे पिकांचे मोठे नुकसान...
माण- खटाव तालुक्‍यात बिलांअभावी...बिजवडी, जि.सातारा  : माण- खटाव तालुक्‍यात...
मराठवाड्यातील २२५ मंडळांत पुन्हा पाऊस,...औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण मंडळांपैकी...
परभणी, हिंगोली, नांदेडातील चक्रीवादळ...परभणी : गतवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात ‘...
नाशिकमध्ये सोयाबीनसह मका बियाण्यांच्या...नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन व मका...
अकोला जिल्ह्यातील पेरण्या रखडलेल्याच अकोला  ः जून महिना संपुर्ण उलटला, तरी...
वाशीममध्ये पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत...वाशीम : ‘‘जिल्ह्यात सन २०२०-२१ खरीप...
यवतमाळ जिल्ह्यात बियाणे न उगवण्याच्या...यवतमाळ : जिल्ह्यात उगवणविषयक तब्बल १५०० पेक्षा...