agriculture news in Marathi flood condition decreasing in Ratnagiri Maharashtra | Page 2 ||| Agrowon

रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड सुरू 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

 जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर, दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. 

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर, दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. खेड तालुक्यातील पोसरेत अजूनही पंधरा जण गाडले गेल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे. तसेच चिपळूण शहरातील घरांसह दुकानांमध्ये साचलेला चिखल साफ करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. 

खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापुरातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. खेड तालुक्यातील पोसरे येथे सात घरांवर दरड कोसळून १७ जण गाडले गेले होते. त्यातील दोन जणांचे मृतदेह एनडीआरएफच्या पथकाला सापडले आहेत. अन्य पंधरा जणांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नदी किनारी भागातील शेकडो एकर भातशेतीचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली असून रस्ता खचला आहे. पावसाच्या पाण्याबरोबर माती व दगड रस्त्यावर आल्यामुळे दोन वाहतूक खंडित झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक बंद राहिल्यामुळे भाजीपाल्यास इंधनाचा तुडवडा रत्नागिरीत जाणवत होता. 

मुंबई - गोवा महामार्गावरील वासिष्ठी, एनरॉन पुलासह पशुराम घाटही खचला आहे. त्यामुळे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. पशुराम घाटात पर्यायी मार्ग तयार करून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. मात्र अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक अजूनही बंदच आहे. आंबा घाटातील दरड काढण्यासाठी अजून एक दिवस लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाजीपाला, दूध यासह पेट्रोल-डिझेलचा तुटवडा रत्नागिरीत जाणवत आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील ओझरे येथे दरड कोसळून एका शेतकऱ्यांचा गोठा उद्‌ध्वस्त झाला. त्यातील चार जनावरे मृत पावली आहेत. यामध्ये दोन लाखांचे नुकसान झाले आहे. 

पिकांना फटका 
राजापूर तालुक्यातून अर्जुना-कोदवली नद्यांसह शुक नदीला आलेल्या पुराने भातशेतीचे नुकसान झाले. भातशेती कुजून गेली असून, पुराने आलेल्या गाळाच्या थरासह शेतात रोपांचे केवळ बुंधे दिसत आहेत. काही भागांमध्ये काही दिवसांपूर्वी लावणी केलेली रोपे पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. तालुक्यातील चौदा गावांतील २२६ शेतकरी बाधित झाले असून, सुमारे ४८.२७ हेक्टर क्षेत्रातील भातशेतीसह नारळ बागायतींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रत्नागिरी तालुक्यातील ४० हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. 
 


इतर बातम्या
जालन्यात ३९९५ खातेदारांचे आधार...जालना : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण १...
जळगाव जिल्ह्यात फळपीक विमा योजनेतून...जळगाव  : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
कोल्हापूर :महावितरणच्या थकबाकीमुक्तीत ...कोल्हापूर : कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
नाशिक : शेतकरी सोसायटीकडून सभासदांना १५...नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात...
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीत...सोलापूर ः कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...