agriculture news in Marathi flood condition decreasing in Ratnagiri Maharashtra | Agrowon

रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड सुरू 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

 जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर, दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. 

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर, दरड कोसळल्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. खेड तालुक्यातील पोसरेत अजूनही पंधरा जण गाडले गेल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे. तसेच चिपळूण शहरातील घरांसह दुकानांमध्ये साचलेला चिखल साफ करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. 

खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापुरातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. खेड तालुक्यातील पोसरे येथे सात घरांवर दरड कोसळून १७ जण गाडले गेले होते. त्यातील दोन जणांचे मृतदेह एनडीआरएफच्या पथकाला सापडले आहेत. अन्य पंधरा जणांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नदी किनारी भागातील शेकडो एकर भातशेतीचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली असून रस्ता खचला आहे. पावसाच्या पाण्याबरोबर माती व दगड रस्त्यावर आल्यामुळे दोन वाहतूक खंडित झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वाहतूक बंद राहिल्यामुळे भाजीपाल्यास इंधनाचा तुडवडा रत्नागिरीत जाणवत होता. 

मुंबई - गोवा महामार्गावरील वासिष्ठी, एनरॉन पुलासह पशुराम घाटही खचला आहे. त्यामुळे वाहतुकीला ब्रेक लागला आहे. पशुराम घाटात पर्यायी मार्ग तयार करून एकेरी वाहतूक सुरू केली आहे. मात्र अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक अजूनही बंदच आहे. आंबा घाटातील दरड काढण्यासाठी अजून एक दिवस लागेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या भाजीपाला, दूध यासह पेट्रोल-डिझेलचा तुटवडा रत्नागिरीत जाणवत आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील ओझरे येथे दरड कोसळून एका शेतकऱ्यांचा गोठा उद्‌ध्वस्त झाला. त्यातील चार जनावरे मृत पावली आहेत. यामध्ये दोन लाखांचे नुकसान झाले आहे. 

पिकांना फटका 
राजापूर तालुक्यातून अर्जुना-कोदवली नद्यांसह शुक नदीला आलेल्या पुराने भातशेतीचे नुकसान झाले. भातशेती कुजून गेली असून, पुराने आलेल्या गाळाच्या थरासह शेतात रोपांचे केवळ बुंधे दिसत आहेत. काही भागांमध्ये काही दिवसांपूर्वी लावणी केलेली रोपे पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. तालुक्यातील चौदा गावांतील २२६ शेतकरी बाधित झाले असून, सुमारे ४८.२७ हेक्टर क्षेत्रातील भातशेतीसह नारळ बागायतींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रत्नागिरी तालुक्यातील ४० हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. 
 


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...