गडचिरोली जिल्ह्यातील नद्यांची पूरस्थिती गंभीर

गडचिरोली
गडचिरोली

गडचिरोली/कोल्हापूर ः मध्य प्रदेशात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे तब्बल ३६ दरवाजे मंगळवारी (ता.१०) उघडण्यात आले. तसेच इतरही प्रकल्पातून विसर्ग सुरु असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, पाल, तठाणीसह अनेक नद्यांना पूर आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या दुथडी भरून वाहत असल्याने जिल्हा मुख्यालयासह शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे.  तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी मंगळवारी (ता. १०) दुपारपर्यंत नद्यांचे पाणी कमी झाले नव्हते. यामुळे पाणीपातळी तातडीने ओसरण्याची शक्‍यता कमी झाली आहे.  श जिल्हयांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतू मध्यप्रदेशात मात्र पावसाचा वाढता जोर आणि संततधार सुरुच आहे. पूर्व विदर्भातील अनेक प्रकल्पाचे साठवणक्षेत्र या भागात आहेत, त्यामुळे पाऊस नसताना देखील पूर्व विदर्भातील अनेक प्रकल्पांच्या पाततळी वाढ नोंदविली गेली आहे. भंडारा जिल्हयातील गोसेखुर्द प्रकल्पाची पातळी देखील वाढल्याने खबरदारीच्या उपाया अंतर्गंत प्रकल्पाचे ३६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सोमवारी (ता.९) प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी (ता.१०) पहाटे देखील प्रकल्पातून पुन्हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्हयातील वैनगंगा, पाल, तठाणी सह अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पूराचे पाणी पुलावरुन वाहत असल्याने सर्वच रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोलीवासीयांचा इतर शहरांशी संपर्क तुटला असून नोकरदारांचे यामुळे हाल झाले आहेत.  कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३९.१० फुटावर स्थिर होती. परंतू दुपारनंतर पुन्हा काहीसा जोर वाढल्याने सायंकाळनंतर पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा वाढ होऊन नदीपातळी ४० फुटावर गेली. मंगळवारी दुपारी दोन वाजता ती पुन्हा ३९.११ फुटावर आली. मंगळवारी दिवसभरही जिल्ह्यात ढगाळ हवामानच होते. ४३ फूट ही धोक्‍याची पातळी असल्याने प्रशासनापुढेही नेमके काय करायचे याबाबत पेच निर्माण झाला आहे. मंगळवारी दुपारपर्यंत राधानगरी धरणाच्या २ स्वयंचलित दरवाजांमधून ४२५६, कोयनेतून २००३४ तर अलमट्टीमधून २१३४९१ पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील ५४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोयना धरणांतून विसर्ग कमी करण्यात आल्याने कृष्णा नदीची पाणीपातळीही स्थिर होती.  आलमट्टी धरणातून सोमवारी दुपारपर्यंत २५०००० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. सायंकाळी उशिरा तो २१३४९१ इतका करण्यात आला. दरम्यान नव्याने आलेल्या पुरामुळे मंगळवार अखेर शिरोळ व करवीर तालुक्‍यातून एक हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारपर्यत  राजाराम बंधारा ४० फूट, सुर्वे ३८ , रुई ६८.९ , इचलकरंजी ६४.३ , तेरवाड ५८.६ , शिरोळ ५८ , नृसिंहवाडी ५७.६ , राजापूर ४७.३  तर नजीकच्या सांगली ३२.७ फूट आणि अंकली बंधाऱ्यात  ३८.३ फूट पाणीपातळी होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com