agriculture news in marathi, flood condition in kolhapur district worsen | Agrowon

कोल्हापूर बेहाल; दहा हजार नागरीकांचे स्थलांतर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कोल्हापूर : विविध नद्यांच्या पुरामुळे कोल्हापूर शहरासह जिल्हा हादरला आहे. सातत्याने पाण्यात वाढ होत असल्याने मंगळवार दुपारपर्यंत दहा हजार हुन अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गतीने पाणी वाढत असल्याने मंगळवार सकाळ पासूनच अनेक गावात जनावरासह संसार सुरक्षित ठेण्यासाठी ग्रामस्थानची धावपळ उडाली.

संभाव्य पुर परिस्थिती लक्षात घेता अनेक गावे पूर्ण रिकामी करण्याचे आदेश प्रशासनाने दिलें आहेत. पिण्यासाठी पाणी नाही,  जाण्यासाठी रस्ते नाहीत आणि वीज सुद्धा नाही अशी कोल्हापुर जिल्ह्याची झाली आहे.

कोल्हापूर : विविध नद्यांच्या पुरामुळे कोल्हापूर शहरासह जिल्हा हादरला आहे. सातत्याने पाण्यात वाढ होत असल्याने मंगळवार दुपारपर्यंत दहा हजार हुन अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गतीने पाणी वाढत असल्याने मंगळवार सकाळ पासूनच अनेक गावात जनावरासह संसार सुरक्षित ठेण्यासाठी ग्रामस्थानची धावपळ उडाली.

संभाव्य पुर परिस्थिती लक्षात घेता अनेक गावे पूर्ण रिकामी करण्याचे आदेश प्रशासनाने दिलें आहेत. पिण्यासाठी पाणी नाही,  जाण्यासाठी रस्ते नाहीत आणि वीज सुद्धा नाही अशी कोल्हापुर जिल्ह्याची झाली आहे.

 अतिवृष्टीने कहर केल्यामुळे कोल्हापूर शहर "ब्लॉक" झाले असून कोल्हापूर शहराचा चोहोबाजूंनी संपर्क तुटला आहे. शहर आणि जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाकडे असलेली यंत्रणाही अपुरी पडत असल्याने शहर आणि जिल्हा प प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न अपुरी ठरत आहेत. सर्वांनी संयम ठेवावा, अपेक्षित सर्व मदत देण्यासाठी प्रशासन  प्रयत्न करत आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 50 गावातील 46 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. धोकादायक परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. जेथे शक्य आहे तेथे वीज पुरवठा खंडित करणे सुरू करण्याचे काम सुरू आहे. 

शहरातून बाहेर जाण्यासाठी एकही रस्ता खुला नाही. महामार्ग हा एकमेव असलेला पर्याय सुद्धा मध्यरात्रीपासून बंद झाला आहे. दरम्यान मंगळवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणांचा विसर्ग कायम राहिला. दिवसभर पाऊस व धरणातून जादा पाणी सोडण्यात येत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीची लाट पसरली आहे


इतर अॅग्रो विशेष
मुंबईत पावसाची दमदार हजेरी; आज...मुंबई : मुंबईतील अनेक भागांत शुक्रवार (ता.३...
वाढत्या तणावात कापसाच्या होताहेत वातीचालू हंगामातील कापूस वेचणी दोन ते अडीच महिन्यांत...
बाजारपेठा काबीज करण्याची हीच संधीको रोनाच्या वैश्‍विक संकटाशी लढताना जगातील अनेक ...
जिल्हा बॅंकांची थकबाकी २३ हजार कोटींवरसोलापूर : राज्यात कर्जमाफी योजना लागू असली, तरी...
कृषी पदविका, तंत्रनिकेतनच्या अंतिम...पुणे  : राज्यातील कृषी पदविका व तंत्रनिकेतन...
भारतीय अन्न महामंडळाबाबतचा शांता कुमार...पुणे : भारतीय अन्न महामंडळाची (एफसीआय) उपयुक्तता...
पंधरा हजार कोटींची शेतीमाल निर्यात...पुणे : जागतिक कृषी उत्पादनाच्या नकाशावर बलाढ्य...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोरपुणे  : मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणात दडी...
शेतकऱ्यांनी घोषणापत्र न दिल्यास बँका...पुणे  : खरीप विमा योजनेत सहभागी होण्यासाठी...
अप्रमाणित बियाण्यांबाबत न्यायालयात दावे...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना अप्रमाणित...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून...पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे...
भारत-चीन तणावाचा कापूस निर्यातीला फटकाजळगाव ः जगभरात वस्त्रोद्योगाची चाके फिरण्यास...
खानदेशात कापूस खरेदीला ‘ब्रेक’जळगाव ः शासकीय कापूस खरेदीला खानदेशात मागील...
बोगस बियाणे प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा...पुणे ः सोयाबीनच्या बोगस बियाणेप्रकरणी मुख्यमंत्री...
लॉकडाउनमध्ये १४ लाख क्विंटल फळ,...लातूर ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सुरू...
राज्यात ठिबक अनुदानासाठी १९१ कोटी रुपये...सोलापूर : राज्यात यंदा दोन लाख १३ हजार ७५५...
पीककर्ज द्या, अन्यथा पोलिसांत तक्रारसोलापूर : पीककर्जाचे शासकीय नियमानुसार वितरण न...