agriculture news in Marathi flood condition in Kolhapur Maharashtra | Page 3 ||| Agrowon

कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता. जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी धोका पातळीपर्यंत पोहोचल्याने जिल्ह्याला पुराने वेढले आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता. जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पाणी धोका पातळीपर्यंत पोहोचल्याने जिल्ह्याला पुराने वेढले आहे. पावसाने कोल्हापूर शहरामध्ये ही दाणादाण उडाली. अनेक गावांत स्थलांतर सुरू झाले आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्ह्यातील ११६ बंधारे पाण्याखाली होते. रस्त्यावर पाणी आल्यामुळे ५३ गावांचा संपर्क तुटला आहे. 

पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९, तर धोकापातळी ४३ फूट असतानाही पन्नास फुटांपर्यंत पाणी पोहोचले आहे. शहरातही पाणी घुसले. सध्या कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याचा विसर्ग हा ६८ हजार ३३४ क्‍युसेक आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता अलमट्टी धरणातून सुमारे दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तरीही पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्यावर 49 फुटांहून अधिक आहे. 2019 मध्ये ही पातळी सर्वाधिक म्हणजे 54 फुटांपर्यंत पोहोचली होती. 

करवीर तालुक्यातील परिते रस्त्यावर दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. अनेक कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यास एनडीआरएफच्या टीमसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन काम करीत आहे. दरम्यान चिखली आंबेवाडी येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या सह्याने पंचगंगा नदीवर आणण्यात आले. एनडीआरएफ जवानांनी नागरिकांची सुटका केली आहे. 

करवीर तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला आहे. चिखलीमध्ये १३२३ कुटुंबांचे, आंबेवाडीत ७०, आरेमध्ये २९०, साबळेवाडीत तीन, केर्लीमधील पाच, परितेतील एक, खुपिरेतील दोन, कळंबे तर्फे कळेतील तीन, भामटेमधील नऊ, अशी एकूण १७०१ कुटुंबे स्थलांतरित केली आहेत. पन्हाळा तालुक्यातील २२१ कुटुंबे, तर शाहूवाडी तालुक्यातील १३८ कुटुंबे स्थलांतरित केली आहेत. राधानगरी तालुक्यातील सोळा कुटुंबे स्थलांतरित केली आहेत. हातकणंगलेमधील निल्लेवाडीतील ३५ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. आजरा तालुक्यातील तीन कुटुंबांचे, भुदरगड तालुक्यातील १७, चंदगड तालुक्यातील कोवाड येथील ३२ कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. शिरोळ तालुक्यातील कवठेसार येथील ५८ कुटुंबे स्थलांतरित केली आहेत. 

अनेक महामार्ग बंद 
पूरपरिस्थितीमुळे चंदगड, गडहिंग्लज, आजरा मार्ग बंद झाले आहेत. कर्नाटक मार्गावरून चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागात येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना आरटीपीसीआर तपासणी बंधनकारक करू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे- बेंगलोर एनएच 4 हायवे लगत असणारे सांगली फाटा ते कोल्हापूरकडे जाणारा सर्व्हिस रोड व बंगळूर- पुणेकडून शिरोलीकडे जाणारा सर्व्हिस रोडवर 3-4 फूट पाणी असल्याने बंद करण्यात आलेले आहेत. 


इतर अॅग्रो विशेष
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
उच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...
भरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...
मध केंद्र योजनेंतर्गत साहित्य  स्वरूपात...नाशिक : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
ठिबक अनुदान वाटपाच्या  प्रक्रियेवर...पुणे : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अनुदान...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती...जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
सौरकृषी पंपाच्या  कुसुम योजनेला अखेर...पुणे : उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे गेली...
पीक नुकसान तक्रारीसाठी धडपड औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
पंधरा हजार एकरवर बांबू लागवडनगर ः जगात सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या परंतु...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उघडीप दिलेल्या पावसाला पोषक हवामान...
मराठवाड्यात २०० मेगावॉटचा सौर प्रकल्प ः...औरंगाबाद ः मराठवाड्यात येत्या वर्षात २००...
विदर्भ, मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाजपुणे : कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि...
महावितरणच्या वीजग्राहकांसाठी रूफटॉपमुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील...
सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत...पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित...