कोल्हापुरात पुराची भीती कायम 

पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत पूर्ण उसंत घेतल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. धरणांच्या पाणलोट क्षेत्राची पाऊस कमी झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुमारे अर्धा फुटाने घट झाली.
kop rain
kop rain

कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत पूर्ण उसंत घेतल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. धरणांच्या पाणलोट क्षेत्राची पाऊस कमी झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुमारे अर्धा फुटाने घट झाली. पावसाने उघडीप दिल्याने स्थलांतराचा दबाव कमी झाला असला, तरी शनिवारी दिवसभर महापुराची भीती कायम होती. दरम्यान, एनडीआरएफच्या आणखी चार तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. 

तब्बल ४८ तासांनंतर जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले. पंचगंगा नदीची पातळी ५५.१० फुटांवरून ५५.६ फुटांवर आली. पाऊस कमी झाल्याने राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले नाहीत. कोयना व वारणा धरणांतून सोडण्यात येणारे पाणी गतीने कमी करण्यात आले. यामुळे शिरोळ तालुक्यात पूरही कमी येण्याची शक्यता आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत दोन्ही धरणांतून मिळून जवळपास २५ हजार क्‍युसेक पाणी कमी करण्यात आले, तसेच अलमट्टी धरणातून तीन लाख ऐवजी साडेतीन लाख क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामुळे शुक्रवारी पाच व्यक्तींना जीव गमवावा लागला. 

अद्यापही कोल्हापूर जिल्ह्यातील १०४ हून अधिक बंधारे पाण्याखाली असल्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. तसेच कोल्हापूर येथे पुणे- बंगळूर महामार्गसुद्धा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी, सांगली फाटा परिसरात दोन हजारांहून अधिक वाहने थांबवून आहेत. 

खरीप पिकांचे अपरिमित नुकसान  अतिवृष्टी व नद्यांच्या पाण्याने वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या खरीप पिकाला दणका दिला आहे. महापुराने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. पिकाबरोबरच ऊस पिकाचेही मोठे नुकसान होणार आहे, याबाबतचा तपशील संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com