agriculture news in marathi, flood condition lowers in kolhapur district | Agrowon

कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग सुरूच; बचावकार्य थांबविले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती ओसरेल, तसा स्वच्छता मोहिमेने वेग घेतला आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यांतील अजूनही बऱ्याच गावांचा रस्ता संपर्क पूर्ववत झाला नाही. परिणामी विविध शाळांमध्ये या भागातील पूरग्रस्त अद्यापही थांबूनच आहेत. कोल्हापूर शहरातील पुराच्या पाण्याने वेढलेला भाग बहुतांशी ठिकाणी मुक्त झाला. यामुळे शहरात सफाई मोहिमेने वेग घेतला आहे.

कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती ओसरेल, तसा स्वच्छता मोहिमेने वेग घेतला आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यांतील अजूनही बऱ्याच गावांचा रस्ता संपर्क पूर्ववत झाला नाही. परिणामी विविध शाळांमध्ये या भागातील पूरग्रस्त अद्यापही थांबूनच आहेत. कोल्हापूर शहरातील पुराच्या पाण्याने वेढलेला भाग बहुतांशी ठिकाणी मुक्त झाला. यामुळे शहरात सफाई मोहिमेने वेग घेतला आहे.

जिल्ह्यात मात्र अद्याप संमिश्र स्थिती असून, पूरग्रस्तांच्या समस्या तातडीने कमी होण्याची शक्‍यता नसल्याचे चित्र आहे. ज्या गावाचे मार्ग अद्याप बंद आहेत, त्या गावात स्थानिक होड्यांमार्फत गावातील लोकांना अन्न पुरविण्याचे काम सुरू होते. जिल्ह्यातील धरणांचा विसर्ग अजूनही कमी झाला नाही. परंतु पाऊस नसल्याने पुराचे पाणी ओसरत असल्याचे चित्र आहे. पाणी ओसरत असल्याने बचावकार्य थांबविण्यात आले आहे. तसेच हवाई मदतही थांबविण्यात आली आहे. मदतीसाठी आलेले जवान मुख्यालयाच्या ठिकाणी परतत आहेत.

बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राधानगरी धारणातून १४०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून २७,०१७ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी बुधवारी (ता. १४) दुपारी बारा वाजता ४३ फूट होती. एकूण ५३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात पूर परिस्थितीनंतर राज्यभरातून मदतीचा ओघ सुरूच असून, तालुक्‍याच्या मुख्यालयामध्ये मदत संकलित करून घेतली जात आहे. अन्न व जीवनावश्‍यक वस्तू थेट पूरग्रस्तांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणी देण्यात येत आहेत. अनेक गावांनी वस्तू एकत्रित ठेवून पूरग्रस्त घराकडे जाताना त्यांना मदत देण्याचे नियोजन केले आहे. पूर ओसरेल तसे घरांच्या पडझडींचे प्रमाण वाढत आहे.

यामुळे आसरा कुठे घ्यायचा या विवंचनेत पूरग्रस्त आहेत. अनेक जण घरांची पडझड होत असल्याने पाहुण्यांच्या घरी काही दिवसांकरिता जात असल्याचे चित्र गावागावांत आहे. शासनाच्या वतीने प्रतिकुटुंब ५००० रुपयांच्या तातडीच्या मदत देण्यास मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. गावागावामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती यांच्यामार्फत जंतुनाशक औषधांची फवारणी करून पाणी आलेली ठिकाणे स्वच्छ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही मंडळांनीही पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम सुरू केले आहे. शेतातून पाणी गेले असले तरी, अद्याप शेतात जाणे शक्‍य नसल्याने शेतीच्या दुरुस्तीची कामे सुरू होण्यास अद्याप दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. बस वाहतूकही अंदाज घेऊनच सुरू करण्यात येत आहे.

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी शाळांत पूरग्रस्तांचीच उपस्थिती
जिल्ह्यातील अनेक शाळा पूरग्रस्तांनी भरून गेल्या आहेत. यामुळे शाळांनाही गेले आठवडाभर सुटी देण्यात आली. उद्या (गुरुवार, ता. १५) साजरा होणारा स्वातंत्र्य दिन आता पूरग्रस्तांसोबत शाळांना साजरा करावा लागणार आहे. सुट्या असल्याने स्वातंत्र्य दिनादिवशी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम अनेक शाळांनी रद्द केले असून, साध्या पद्धतीने ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहेत.

 


इतर अॅग्रो विशेष
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...
पोतेकरांची देशी केळी वर्षभर खातेय भावसातारा जिल्ह्यातील शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील...
अजून एक ‘बारामती पॅटर्न’कार्यालय आम्हाला घरच्यासारखे वागवते, कर्मचारी...
‘तारीख पे तारीख’ किती दिवस?देशाचे पंतप्रधान दमदार भाषणात जनतेला आश्‍वासन...
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....