agriculture news in marathi, flood condition may be in koyana river | Agrowon

कोयनेत पूरस्थिती शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाणलोट क्षेत्रात 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी आज पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पावणेसहा फूट उचलण्यात आले. त्यामुळे पायथा वीजगृहासह नदीपात्रात 50 हजार 420 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पूरपरिस्थिती निर्माण होणार असल्याने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाणलोट क्षेत्रात 100 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी आज पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पावणेसहा फूट उचलण्यात आले. त्यामुळे पायथा वीजगृहासह नदीपात्रात 50 हजार 420 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पूरपरिस्थिती निर्माण होणार असल्याने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भातील काही भाग आणि दक्षिण महाराष्ट्र येथे पावसाने ओढ दिली आहे, त्यामुळे या भागात गेल्या अडीच महिन्यातील पावसाची सरासरीही गाठली गेली नाही. या पार्श्‍वभूमीवर बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

जोरदार पावसाची शक्‍यता
महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि गुजरातचा दक्षिण भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. 17) पश्‍चिम विदर्भ, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


इतर ताज्या घडामोडी
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...
गुलटेकडी येथे ‘तोलणारां’चे धरणे आंदोलनपुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमधील भुसार...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ९३...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या...
पंतप्रधानांनी घेतली ‘जय सरदार’ची दखल बुलडाणा ः शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर...
कोल्हापुरात दसरा सोहळा साध्या पध्दतीने...कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा...
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाः उद्धव...मुंबई: राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी...
डाळिंब फळबागेचे हंगामनिहाय नियोजनतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...