Agriculture news in marathi, The flood condition recover of 'Marathwadi' in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या पुराचा विळखा सैल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडी धरणातील जलाशयांतर्गत गावांना पडलेला पुराचा विळखा आता पावसाच्या उघडिपीमुळे सैल होत आहे. तरीही तेथील अनेक घरे, मंदिरे आणि सार्वजनिक विहिरी अजूनही पाण्यातच असल्याने समस्यांचा हा महापूर कधी हटतोय, याकडे धरणग्रस्त डोळे लावून आहेत. 

ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडी धरणातील जलाशयांतर्गत गावांना पडलेला पुराचा विळखा आता पावसाच्या उघडिपीमुळे सैल होत आहे. तरीही तेथील अनेक घरे, मंदिरे आणि सार्वजनिक विहिरी अजूनही पाण्यातच असल्याने समस्यांचा हा महापूर कधी हटतोय, याकडे धरणग्रस्त डोळे लावून आहेत. 

नऊ वर्षांपासून मराठवाडी धरणात ०.६० टीएमसी पाणीसाठा होत होता. या वर्षी सांडव्याचे बांधकाम केल्याने त्याची पाणी साठवणक्षमता वाढून १.०५ टीएमसी झाली. अलीकडेच सलग १५ दिवस झालेल्या संततधार पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यावरून पाणी वाहत आहे. जलाशयाच्या काठावरील मेंढ, उमरकांचन, घोटील या गावांना पाण्याचा वेढा आहे. तेथील अनेक घरे, सार्वजनिक विहिरी, शेती, स्मशानभूमी पाण्यात असल्याने काही कुटुंबांनी पाटबंधारे विभागाने उभारलेल्या निवारा शेडमध्ये संसार हलविला आहे. 

आता उघडिपीमुळे पाण्याची आवक जवळपास दहापटीने कमी झाल्याने आणि प्रवेशद्वारातूनही अखंड विसर्ग सुरू असल्याने हळूहळू पाणी ओसरत आहे. पाण्याबाहेर आलेल्या घरांत व रस्त्यांवर गाळ साचल्याचे दिसत आहे. दगड, विटा व मातीत बांधलेली जुनी घरे धडाधड कोसळत असल्याने धरणग्रस्तांच्या चिंतेत भर पडत आहे. 

मेंढ, उमरकांचन, घोटील येथील मंदिरांसह काही घरे आणि पाणीपुरवठ्याच्या विहिरीना अजूनही पाण्याचा वेढा कायम आहे. तो कधी हटतोय याकडे धरणग्रस्त डोळे लावून आहेत. धार्मिक सण, उत्सव जवळ आल्याने मेंढचे ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग मंदिराची पुरातून लवकर सुटका व्हावी, त्यासाठी विसर्ग आणखी वाढवावा, अशी मागणी तेथील जितेंद्र पाटील यांच्यासह अन्य धरणग्रस्तांनी केली.


इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी...यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
बागलाण तालुक्यात खत पुरवठा करून पिळवणूक...सटाणा, जि. नाशिक : बागलाण तालुक्यात गेल्या...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी रयत क्रांती...नाशिक : खरिपाच्या तोंडावर सध्या शेती कामांना वेग...
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेला दोन...मुंबई: मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम...