कऱ्हाड, पाटण तालुक्यात नदीकाठी पुन्हा पूरसदृश स्थिती

कऱ्हाड, पाटण तालुक्यात नदीकाठी पुन्हा पूरसदृश स्थिती
कऱ्हाड, पाटण तालुक्यात नदीकाठी पुन्हा पूरसदृश स्थिती

कऱ्हाड, जि. सातारा ः सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसाने आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने कऱ्हाड-पाटण तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. पाटण तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला असून, कऱ्हाड तालुक्यातील नदीकाठची शेती पुन्हा पाण्याखाली गेली आहे. कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी धसकाच घेतला आहे. 

कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजांतून १० फुटांनी पाणी सोडण्यात आल्याने कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. ओढे-नालेही भरून वाहू लागले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तांबवेजवळील जुना कोयना पूल, पाटण तालुक्यातील मुळगाव, नेरळे व अन्य काही पूल पाण्याखाली गेले आहेत. पाटण तालुक्यातील काही गावांचा संपर्कही तुटला आहे. पाटण शहरात काही ठिकाणी पाणी घुसले आहे. मुळगाव व नेरळे पूल पाण्याखाली गेल्याने मुळगाव त्रिपुडी व चोपडीसह संपूर्ण मोरणा विभागाला होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या गावामधील जनतेला नवा रस्तामार्गे पाटणला यावे

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला जिल्ह्यात दुष्काळी भागांचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांत पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत सरासरी २३.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात बुधवारी सांयकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेकठिकाणी अधूनमधून पावसाचा दमदार सरी कोसळत आहे. गुरुवारी सकाळपासून संततधार पाऊस सूरू आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्‍वर, जावळी व पाटण तालुक्यात २४ तासांत ४० मिलिमीटरपेक्षा आधिक पाऊस झाला आहे. 

सर्वाधिक भात पिकांस हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. मात्र पावसाचे प्रमाण वाढत असल्याने अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे. यामुळे प्रमुख नद्याच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे पुराचे संकट पुन्हा दिसत असल्याने ग्रामस्थाच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयना धरणातील विसर्गामुळे कराड व पाटण तालुक्यात सर्वाधिक भीतीचे वातावरण झाले आहे. अगोदर झालेल्या अतिवृष्टी पिकांचे मोठे नुकसान झाले आहेत. त्याचे पंचनाम्याचे काम पूर्ण झाले नसताना पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटर) व कंसात एकूण पाऊस : सातारा- २२.८८ (१६८४.३१), जावळी- ५१.०२ (२१६८.०५), पाटण- ४०.०० (१९२९.४८), कराड- १२.६२ (९७०.३८), कोरेगाव- ९.२२ (६६२.००), खटाव- ३.३३ (४२१.२२), माण- ० (१६१.४१), फलटण- २.७८ (१९०.५६), खंडाळा- ३.२५ (५०६.९०), वाई- २०.३४ (८६३.६६), महाबळेश्वर- १६७.४८(६८५१.६४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com