agriculture news in Marathi, Flood death toll in Assam, Bihar reached at 114, Maharashtra | Agrowon

आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळी
वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

नवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान सुरूच आहे. आसाम राज्यात तब्बल २८ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती असल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरून लाखो नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. आसाममध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला असून, बिहारमध्ये ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

नवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान सुरूच आहे. आसाम राज्यात तब्बल २८ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती असल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरून लाखो नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. आसाममध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला असून, बिहारमध्ये ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

उत्तर आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस होत असल्याने त्याचा फटका शेती आणि ग्रामीण भागाला बसत आहे. पंजाबमध्ये घग्गर नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर वाहत असून, अनेक भागांत नदीचे पाणी शिरले आहे. तसेच पंजाबच्या संग्रुर जिल्ह्यात घग्गर नदीला ५० फुटाचे भगदाड पडल्याने दोन हजार एकरांवरील शेती पाण्याखाली गेली असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. सैन्यदलाचे जवान या भागात बचावकार्य करत आहेत. 

आसाममध्ये ३६ मृत्यू
आसाम राज्यात ३३ जिल्ह्यांपैकी तब्बल २८ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. पुरामुळे राज्यातील ५४ लाख लोकांचे जनजीवन प्रभावित झाले असून त्यांना स्थलांतर करावे लागले आहे. राज्यात पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३६ वर पोचली आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असून ५३ लाख ५२ हजार १०७ लोकांना आत्तापर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती आसाम आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

बिहारमध्ये सर्वाधिक जीवितहानी 
बिहारमध्ये नेपाळच्या बाजूच्या जिल्ह्यांमध्ये पूर आल्याने आत्तापर्यंत ७८ लोकांचा मृत्यू झाला आहे. सितामऱ्ही जिल्ह्यात सर्वाधिक १८ मृत्यू झाले असून मधुबनी १४, अरारिया १२, शोहार ९, दरभंगा ९, पुरनिया ७, किशनगंज ४, सुपौल ३ आणि पूर्व चंपारणमध्ये २ मृत्यू झाले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...