Agriculture news in marathi, Flood down in Solapur district , situation improves | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील पूर ओसरला, परिस्थितीत सुधारणा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग कमी-जास्त करण्यात येत होता. मंगळवारी (ता. १३) भीमा नदीतून पाच हजार क्युसेक विसर्ग होता. बुधवारी (ता. १४) त्यात पुन्हा वीस हजार क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली. तसेच वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे सध्या उजनी धरणातून भीमा नदीत फक्त २० हजार क्युसेक एवढाच विसर्ग आहे. 

सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग कमी-जास्त करण्यात येत होता. मंगळवारी (ता. १३) भीमा नदीतून पाच हजार क्युसेक विसर्ग होता. बुधवारी (ता. १४) त्यात पुन्हा वीस हजार क्युसेकपर्यंत वाढ करण्यात आली. तसेच वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे सध्या उजनी धरणातून भीमा नदीत फक्त २० हजार क्युसेक एवढाच विसर्ग आहे. 

दौंड कडू उजनी धरणामध्ये १८ हजार ५२० एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणात येणारे पाणी आणि धरणातून पुढे जाणारे पाणी याचा विसर्ग केवळ वीस हजार क्युसेक असल्याने पूरपरिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. उजनीची पाणी पातळी ही १०६ टक्क्यांवर स्थिर  आहे.

सांगवी येथील दोघांचा भीमा नदीच्या पुरात बुडून मृत्यू
उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे सांगवी (ता. पंढरपूर) येथील हनुमंत गलांडे (वय ५०) व धुळा गलांडे (वय ५५) ह्या दोघांचा भीमा नदीच्या पुरात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. ११) घडली. मंगळवारी (ता. १३) तिसऱ्या दिवशी दोघांचेही मृतदेह बाहेर काढून करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत करकंब पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

भीमा नदीच्या पुराचे पाणी सांगवी येथील ओढ्यात मागे सरले होते. रविवारी धुळा गलांडे व हनुमंत गलांडे हे एकादशीसाठी पंढरपूरला निघाले होते. दोघांनीही अंगातील कपडे काढून डोक्याला बांधून ओढा पार करण्याचा प्रयत्न केला. पण ओढ्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. हे दोघेही प्रत्येक एकादशीस पंढरपूरला जात होते. पण यंदा काळाने त्यांच्यावर झडप घातली. सहायक पोलिस निरक्षक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दादासाहेब सुळ व संतोष पाटेकर तपास करीत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...