agriculture news in marathi, flood level to ground in Sangli | Agrowon

सांगलीत पूर ओसरला; गावांत अजूनही पाणी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

सांगली : पूर ओसरलाय...गाव सोडलेली लोकं पुन्हा गावाकडं जाऊ लागली आहेत. गावात पोचल्यानंतर झालेलं नुकसान बघून आता संसाराचा गाडा कसा उभा करायचा, असा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्यातील सांगली महापालिकेसह १०७ गावांमधील सुमारे ७५ हजार कुटुंबांना महापुराने फटका दिला आहे.

सांगली : पूर ओसरलाय...गाव सोडलेली लोकं पुन्हा गावाकडं जाऊ लागली आहेत. गावात पोचल्यानंतर झालेलं नुकसान बघून आता संसाराचा गाडा कसा उभा करायचा, असा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्यातील सांगली महापालिकेसह १०७ गावांमधील सुमारे ७५ हजार कुटुंबांना महापुराने फटका दिला आहे.

साडेतीन लाखांहून अधिक नागरिकांना महापुराने उद्‌ध्वस्त केले आहे. सांगली शहरातील आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी ४१ फुटापर्यंत पोचली असून धोका पातळीच्या खाली गेली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यातील वाळवा, मिरज, शिराळा, पलूस या तालुक्यातील पूर ओसरला आहे. नागरिक गावाकडं जाऊ लागले आहेत. राज्यातून जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी संसार उभा करणे मोठे आव्हानात्मक आहे. जिल्ह्यात दुपारपर्यंत सुमारे ६ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. 

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ, खटाव, माळवाडी, भिलवडी, सुखवडी, चोपडेवाडी या गावांत अजून पाणी आहे. हे पाणी कमी होण्यास अजून पाच ते सहा दिवस जाणार आहे. त्यानंतर या गावातील स्थिती विदारक असणार आहे. ज्या गावातील पाणी कमी झाले आहे, त्या गावात लोक जाऊ लागले आहेत. गावात जाताच शेतीचं झालेलं नुकसान, पडलेली घरं, दावणीची जनावरं पुराच्या पण्यातून वाहून गेलेली हे सारं पाहताच लोकांच्या डोळ्यातून पाणी आलं. आता घर पुन्हा कसं उभा करायचं, यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न आवासून समोर उभा होता.


इतर ताज्या घडामोडी
रताळे वनस्पती गंधाद्वारे देते अन्य...एखाद्या हल्ल्याची चाहूल लागल्यास बहुतांश सजीव...
शेतमाल तारण योजनेअंतर्गत कारंजा बाजार...कारंजालाड, जि. वाशीम  ः शेतकऱ्यांचा शेतमाल...
खानदेशात कापूस दर स्थिर; खेडा खरेदीला...जळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
अधिक ओलावा असलेल्या कापसासाठी हवी...वर्धा ः कापसात ओलावा असल्यामुळे प्रक्रिया उद्योजक...
मराठवाड्यात पाच मोठे प्रकल्प तुडुंब औरंगाबाद : मराठवाड्यातील ११ पैकी पाच मोठे...
शेतमालाच्या शिवार खरेदीवर लक्ष द्या :...जळगाव  ः खानदेशात कापसापाठोपाठ केळी, कांदा व...
सोलापुरात चारा छावण्यांवर २४५ कोटी...सोलापूर ः दुष्काळामध्ये जिल्ह्यात चारा छावण्यांवर...
नाशिक : पणन मंडळाच्या केंद्रातून दुबईला...नाशिक : कसमादे पट्ट्यात सटाणा, कळवण, मालेगाव...
परभणी जिल्ह्यात ज्वारीची ८७ हजार...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार...
कांदा व्यापाऱ्यांच्या साठा तपासणीची...नाशिक  : कांदा दराने मोठी उसळी घेतल्याने व...
सोलापूर जिल्ह्यात मदतीचे अनुदान...सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात...
सांगली : पूरग्रस्तांसाठी १०२ कोटी...सांगली : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये...
पुणे विभागात रब्बीचा साडेसात लाख...पुणे  ः चार ते पाच दिवसांपूर्वी अनेक भागांत...
शिरुरमधील साडेसहा हजारांवर शेतकरी...पुणे  ः यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि...
सरकारच्या निर्णयाचा जिल्हा परिषदेला...नगर  ः राज्य सरकारने मागील सरकारच्या काळात...
नगर जिल्ह्यात पाऊण लाख हेक्टरवर रब्बी...नगर  ः जिल्ह्यात रब्बीत आतापर्यंत सुमारे ७५...
हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या :...औरंगाबाद  : राज्यातील गावा-गावांतील रस्ते,...
राष्ट्रवादी गुरुवारी साजरा करणार...मुंबई  ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
राज्यातील पंचायत समिती सभापतींच्या...पुणे  : राज्यातील पंचायत समित्यांचे नवे...
सोलापुरात कांद्याच्या दरातील तेजी...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...