पंढरपुरात पूरस्थिती

सोलापूर ः नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
flood in Pandharpur
flood in Pandharpur

सोलापूर ः नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.  त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले. दरम्यान, या पाण्यामुळे पंढरपुरात पूरस्थिती आहे. नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. 

उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून धरणातून पुढे भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारी (ता.११) ४० हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात येत होता. पण वरच्या धरणातून दौंडकडून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ८४५९ क्युसेक इतका कमी झाला आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.१२) पुढे नदीतील विसर्गही २० हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. पण सातत्याच्या या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपुरातही सध्या नदीला पूरस्थिती आहे. नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. 

पाटबंधारे विभागाला सूचना

चंद्रभागा नदी पात्रात येणाऱ्या वारकरी व भाविकांना नगरपालिका प्रशासनाकडून ध्वनिक्षेपनाद्वारे वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. पूरस्थितीत बोट व्यवस्था, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, तसेच स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थाची पथके तयार करण्यात आली आहेत. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीवेळी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

संभाव्य पूरपरिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तिजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. - गजानन गुरव, प्रांताधिकारी, पंढरपूर  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com