Agriculture news in marathi, flood in Pandharpur | Agrowon

पंढरपुरात पूरस्थिती

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

सोलापूर ः नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.  त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

सोलापूर ः नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.  त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले. दरम्यान, या पाण्यामुळे पंढरपुरात पूरस्थिती आहे. नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. 

उजनी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून धरणातून पुढे भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारी (ता.११) ४० हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात येत होता. पण वरच्या धरणातून दौंडकडून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ८४५९ क्युसेक इतका कमी झाला आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.१२) पुढे नदीतील विसर्गही २० हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. पण सातत्याच्या या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपुरातही सध्या नदीला पूरस्थिती आहे. नदीपात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. 

पाटबंधारे विभागाला सूचना

चंद्रभागा नदी पात्रात येणाऱ्या वारकरी व भाविकांना नगरपालिका प्रशासनाकडून ध्वनिक्षेपनाद्वारे वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. पूरस्थितीत बोट व्यवस्था, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, तसेच स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थाची पथके तयार करण्यात आली आहेत. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीवेळी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

संभाव्य पूरपरिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तिजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.
- गजानन गुरव, प्रांताधिकारी, पंढरपूर
 


इतर बातम्या
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
भातपीक कापणीला  सिंधुदुर्गमध्ये सुरुवात सिंधुदुर्गनगरी : सतत पडणाऱ्या पावसामुळे रखडलेल्या...
‘एफआरपी’ ८०-२०च्या सूत्रानुसार  दिल्यास...माळेगाव, जि. पुणे : ‘‘केंद्र व राज्य सरकारने यंदा...
`दत्त’ देणार एकरकमी  ‘एफआरपी’ २९२०...कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी...
  ‘महाबीज’च्या बीजोत्पादन ...परभणी : ‘महाबीज’च्या परभणी विभागातील सहा...
सोयाबीनच्या गंज्या वाहून गेल्या हिंगोली : मराठवाड्यामध्ये रविवारी (ता.१७) सकाळी...
सांगली जिल्हा बँक निवडणूक  जयंतराव...सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका...
मानोरा तालुक्यात धुवाधार  पावसाने...मानोरा, जि. वाशीम : शनिवारी (ता. १६) झालेल्या...
विदर्भातील पाच जिल्ह्यांत  लाख हेक्‍...अमरावती : खरीप गमावलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता...
विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
  ‘डीएपी’ महागणार नाही पुणे : रब्बी हंगामात देशातील खत उत्पादक...
दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा...नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप...
हे हिंदुत्व नाही, हा नामर्दपणा मुंबई : ‘‘ईडी, सीबीआयच्या माध्यामातून कारवाया करू...
पामतेलातील तेजीने खाद्यतेल दरवाढीला...पुणे : देशात खाद्यतेलाचे दर कमी न होण्यामागे...