Agriculture news in marathi To flood-prone borrowers Take on the role of collaborator | Agrowon

पूरबाधित कर्जदारांना सहकार्याची भूमिका घ्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

पुरामध्ये नुकसान झालेल्या कर्जदारांना त्यांच्या कर्जाच्या खात्याचे पुनर्गठन करताना व पूरबाधित पात्र कर्जदारांना नवीन कर्जपुरवठा करताना बँकांनी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

कोल्हापूर : जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामध्ये नुकसान झालेल्या कर्जदारांना त्यांच्या कर्जाच्या खात्याचे पुनर्गठन करताना व पूरबाधित पात्र कर्जदारांना नवीन कर्जपुरवठा करताना बँकांनी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

     कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त कर्जदारांना बँकांतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत जिल्हास्तरीय बँकर्स सल्लागार समितीची विशेष बैठक जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक संदीपकुमार चौरसिया, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राहुल माने, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, कृषी विभागाच्या सहसंचालक भाग्यश्री पवार, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने विविध बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.

पूर परिस्थितीमुळे खंडित झालेल्या सर्व बँकिंग सेवा सुरळीत करा. पूर परिस्थितीमुळे खराब झालेले पासबुक व एटीएम कार्ड पुन्हा तयार करून द्यावेत. जिल्ह्यातील आधार सेवा केंद्र चालकांनी खराब झालेले आधार कार्ड पुन्हा उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केल्या.

बँकांना दिलेल्या सूचना
शेतकरी, व्यावसायिक, कारागीर, सूक्ष्म व लघू उद्योजकांना रिजर्व्ह बँकेच्या धोरणानुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पुरामुळे ३३ ते ५० टक्क्यांच्या दरम्यान पिकांचे नुकसान झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन दोन वर्षांसाठी करावे. यामध्ये एका वर्षासाठी हप्त्याची सुट्टी राहील. पुरामुळे पिकाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज खाते ५ वर्षांसाठी पुनर्गठीत करून १ वर्षांच्या हप्त्याची सुट्टी राहील, अशा बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार बाधित क्षेत्रासाठी नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.

शेतीसाठी घेतलेल्या मुदत कर्जामध्ये पुरामुळे बाधित झालेल्या पिकावर अवलंबून असलेला हप्ता एक वर्षाने पुढे ढकलण्यात यावा. कर्ज असणाऱ्या शेती उपकरणे व साधनांचे पुरामुळे नुकसान झाले असल्यास त्यांना मागणीनुसार नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. व्यावसायिक, कारागीर, सूक्ष्म, लघू उद्योजक व छोटे व्यापारी यांच्या कर्जाची प्रकरणनिहाय तपासणी करून हप्त्याचे पुनर्गठन किंवा हप्ता पुढे ढकलण्याची कार्यवाही करावी. या रिजर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकांनी कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले.


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...